मुंबई, 24 मार्च : आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सनमध्ये (Chennai Super Kings) मोठा बदल झाला आहे. चेन्नईचा आजवरचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) पदाचा राजीनामा दिला आहे. आता रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) टीमचा कॅप्टन झाला आहे. आता कॅप्टन जडेजाची पहिली परीक्षा शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध होणार आहे. या परीक्षेपूर्वी जडेजाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या मॅचपूर्वी (CSK vs KKR) मोठा दिलासा मिळाला आहे. या मॅचसाठी सीएसकेमधील स्टार पुणेकर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) फिट झाला आहे. ऋतुराजनं मॅच खेळण्यासाठी आवश्यक असलेली फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो आता डेवॉन कॉनवेसोबत ओपनिंग करणार आहे. न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. सीएसके सीईओ काशी विश्वनाथन यांनीही ‘ऋतुराज गायकवाड फिट असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. गायकवाड फिट असून तो सूरतमध्ये चेन्नईच्या इतर खेळाडूंसोबत प्रॅक्टीस करत आहे. तो पहिल्या मॅचसाठी उपलब्ध आहे,’ असे त्यांनी ‘इनसाईड स्पोर्ट्स’ शी बोलताना सांगितले. सीएसके केकेआर विरूद्धच्या पहिल्या मॅचपूर्वी अनेक अडचणींना तोंड देत आहे. दीपक चहर आणि अंबाती रायुडू हे सीएसकेचे प्रमुख खेळाडू दुखापतींनी त्रस्त आहेत. तर मोईन अलीला वेळेवर व्हिसा न मिळाल्यानं तो भारतामध्ये येऊ शकला नाही. दीपक चहर मागच्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्यामध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 मॅचवेळी दुखापतग्रस्त झाला होता. दीपक चहरच्या जांघेच्या मांसपेशींना दुखापत झाली होती. तो सध्या बँगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकडमी म्हणजेच एनसीएमध्ये उपचार घेत आहे. चेन्नईने दीपक चहरला लिलावामध्ये तब्बल 14 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. Women’s World Cup : पाकिस्तानच्या पराभवानंतर इंग्लंड जोमात तर वेस्ट इंडिज कोमात दरम्यान मोईल अलीला व्हिसा मिळाल्यानं त्याचा भारतामध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतामध्ये आल्यानंतर त्याा तीन दिवस क्वारंटाई राहावं लागेल. त्यामुळे शनिवारी होणारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धची मॅच तो खेळू शकणार नाही. तो सीएसकेच्या दुसऱ्या सामन्यापासून निवडीसाठी उपलब्ध होईल. चेन्नईचा दुसरा सामना 31 मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.