जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI : टीम इंडियाच्या विजयानंतरही रोहित नाराज, खेळाडूंची केली कानउघडणी

IND vs WI : टीम इंडियाच्या विजयानंतरही रोहित नाराज, खेळाडूंची केली कानउघडणी

IND vs WI : टीम इंडियाच्या विजयानंतरही रोहित नाराज, खेळाडूंची केली कानउघडणी

टीम इंडियानं कोलकातामध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात (India vs West Indies 2nd T20) थरारक विजय मिळवला. या विजयानंतरही कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळाडूंवर नाराज आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी : टीम इंडियानं कोलकातामध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात (India vs West Indies 2nd T20) थरारक विजय मिळवला. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांनी डेथ ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंग केल्यानं भारतानं 8 रननं विजय मिळवला. या विजयाबरोबरच टीम इंडियाने 3 सामन्यांच्या या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. यापूर्वी भारतीय टीमनं वन-डे सीरिजमध्येही वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. टीम इंडियानं मालिका जिंकल्यानंतरही कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) नाराज होता. त्याने मॅचनंतर बोलताना ही नाराजी व्यक्त केली. भारतीय टीमच्या खराब फिल्डिंगवर कॅप्टननं नाराजी व्यक्त केली आहे. रोहित यावेळी म्हणाला की, ‘वेस्ट इंडिजचे खेळाडू हे निर्भिडपणे खेळतात. त्यामुळे त्यांच्या विरूद्ध खेळणे अवघड असते. भुवनेश्वरनं त्याचा अनुभव पणाला लावून टीमला मॅचमध्ये परत आणले. विराटने महत्त्वाची खेळी केली. पंत आणि अय्यरनंही चांगली भागिदारी केली. आम्ही फिल्डिंग चांगली केली नाही. त्यामुळे मी थोडा निराश आहे. आम्ही ते कॅच पकडले असते तर मॅचचं चित्रं वेगळं असतं’ कुणी सोडले कॅच? टीम इंडियानं फिल्डिंग करताना वेस्ट इंडिजच्या बॅटर्सचे कॅच सोडल्यानं रोहित नाराज झाला आहे. पाचव्या ओव्हरमध्ये व्यंकटेश अय्यरनं ब्रँडन किंगचा कॅच सोडला. त्यानंतर रवी बिश्नोईने 10 व्या ओव्हरमध्ये निकोलस पूरनला जीवदान दिलं. बिश्नोईची चूक टीम इंडियाला महाग पडली. पूरननं पुढे अर्धशतक झळकावले. त्यानंतर 15 व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीनं रोव्हमॅन पॉवेलला जीवदान दिले. ऋषभ पंतलाही 16 व्या ओव्हरमध्ये पॉवेलचा कॅच पकडता आला नाही. आईने मुलाच्या बॅटसाठी दागिने ठेवले गहाण, पोरानं 22 व्या वर्षीच केला वर्ल्ड रेकॉर्ड रोव्हमन पॉवेलने 36 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले, यात 4 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. निकोलस पूरनने 41 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली. पूरनने 5 फोर आणि 3 सिक्स मारले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि रवी बिष्णोई यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.. आता मालिकेतील तिसरा टी-20 सामना रविवारी कोलकात्यामध्येच होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात