मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ranji : आईने मुलाच्या बॅटसाठी दागिने ठेवले गहाण, पोरानं 22 व्या वर्षीच केला वर्ल्ड रेकॉर्ड

Ranji : आईने मुलाच्या बॅटसाठी दागिने ठेवले गहाण, पोरानं 22 व्या वर्षीच केला वर्ल्ड रेकॉर्ड

बिहारचा 22 वर्षांचा बॅटर साकिबुल गनी (Sakibul Gani) याने  पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावले आहे.  गनीचा हा प्रवास सहज झालेला नाही. त्याच्या आईनं केलेल्या त्यागामुळेच त्याला हा वर्ल्ड रेकॉर्ड करता आलेला आहे.

बिहारचा 22 वर्षांचा बॅटर साकिबुल गनी (Sakibul Gani) याने पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावले आहे. गनीचा हा प्रवास सहज झालेला नाही. त्याच्या आईनं केलेल्या त्यागामुळेच त्याला हा वर्ल्ड रेकॉर्ड करता आलेला आहे.

बिहारचा 22 वर्षांचा बॅटर साकिबुल गनी (Sakibul Gani) याने पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावले आहे. गनीचा हा प्रवास सहज झालेला नाही. त्याच्या आईनं केलेल्या त्यागामुळेच त्याला हा वर्ल्ड रेकॉर्ड करता आलेला आहे.

मुंबई, 19 फेब्रुवारी :  बिहारचा 22 वर्षांचा बॅटर साकिबुल गनी (Sakibul Gani) याने  पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावले आहे. हा विक्रम करणारा तो जगातला पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. याचसोबत तो रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) पदार्पणातच सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडूही बनला आहे. गनीचा हा प्रवास सहज झालेला नाही. त्याच्या आईनं केलेल्या त्यागामुळेच त्याला हा वर्ल्ड रेकॉर्ड करता आलेला आहे.

गरीब कुटंबातील गनीने इथवर पोहचण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. क्रिकेटची एक चांगली बॅट खरेदी करण्यासाठी 30 ते 35 हजार रूपये लागतात. त्याचा मोठा भाऊ फैसल गनीनं ही बॅट घेण्यासाठी कुटुंबाने केलेला संघर्ष सांगितला आहे. 'आमच्याकडे साकिबुलला महागडी बॅट घेऊन देण्यासाठी पैसे नव्हते. पण, आईने त्याची झळ लागू दिली नाही. अडचणीच्या प्रसंगी आईनं दागिने गहाण ठेवून त्याला मदत केली आहे. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेला जाण्यासाठी आईने गनीला 3 बॅट दिल्या. या तीन्ही बॅटनं शतक कर असा तिनं आशीर्वाद दिला होता. गनीनं पहिल्याच मॅचमध्ये त्रिशतक झळकावले.'

7 व्या वर्षीच क्रिकेटला सुरूवात

22 वर्षांच्या गनीनं वयाच्या 7 व्या वर्षीच क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्याचे वडील मोहम्मद मन्नान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गनी मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. आम्ही त्याला सर्व प्रकारची मदत केली. एकदा साकिबुल 2009 साली मोठा भाऊ फैसलला मॅच खेळण्यासाठी पाटणा विमानतळावर गेला होता. आपण क्रिकेट खेळलो तर आपल्यालाही फैसलप्रमाणे विमानाने खेळता येईल, असे त्याला वाटले.' अशी आठवण गनीच्या वडिलांनी सांगितली आहे.

साकिबुल गनीचे हे पहिले त्रिशतक नाही. त्याने अंडर - 23 स्पर्धेतही 306 रनची खेळी केली आहे. त्याचबरोबर त्याने दोन द्विशतकही झळकावली आहेत. क्रिकेटमुळे तो अभ्यासात मागे पडला. त्याने 12 वी ची परीक्षा दिली नाही. गनी फास्ट बॉलिंगही करतो. त्याने आजवर 14 लिस्ट-ए मॅचमध्ये 31 च्या सरासरीनं 377 रन केले असून 4 विकेट्सही घेतल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमधील 9 इनिंगमध्ये 27 च्या सरासरीनं 192 रन केले आहेत.

IND vs WI : 19व्या ओव्हरमध्ये असं काय झालं? मॅचचा निकालच फिरला!

रणजी स्पर्धेत रेकॉर्ड

गनीने मिझोरामविरुद्ध (Bihar vs Mizoram) कोलकात्यामध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात आपलं त्रिशतक 387 बॉलमध्ये 50 फोर मारून पूर्ण केलं. तो रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) पदार्पणातच सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडूही बनला आहे.साकिबुल गनीच्या आधी पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात सर्वाधिक स्कोअर करण्याचा विक्रम मध्य प्रदेशच्या अजेय रोहेराच्या नावावर होता. 2018-19 च्या रणजी मोसमात अजेयने हैदराबादविरुद्ध हे रेकॉर्ड केलं होतं. अजेयने तेव्हा 267 रनची खेळी केली होती.

First published:
top videos

    Tags: Bihar, Cricket news