कानपूर, 25 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्ट कानपूरमध्ये सुरू झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन आहे. कानपूरमध्ये 2016 नंतर पहिल्यांदाच टेस्ट मॅच होत आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच टेस्ट असल्यानं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
स्पिनर्सला साथ देणाऱ्या कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. या टेस्टमध्ये टीम इंडियाकडून मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पदार्पण करत आहे.
🎥 A moment to cherish for @ShreyasIyer15 as he receives his #TeamIndia Test cap from Sunil Gavaskar - one of the best to have ever graced the game. 👏 👏#INDvNZ @Paytm pic.twitter.com/kPwVKNOkfu
— BCCI (@BCCI) November 25, 2021
न्यूझीलंडची टीम भारतामध्ये गेल्या 33 वर्षात एकही टेस्ट मॅच जिंकलेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप राखण्यासाठीची न्यूझीलंडची मोहीम या टेस्टपासून सुरू होत आहे. टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये न्यूझीलंड टीम इंडियाला धक्का देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडियाकडून शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल ही जोडी ओपनिंग करणार आहे. इंग्लंड दौऱ्यात हे दोघंही दुखापतग्रस्त झाले होते. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला मोठी खेळी करण्याची संधी या टेस्टमध्ये आहे. टीम इंडियातच्या Playing 11 मध्ये आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तीन स्पिनर्सचा समावेश असून कानपूरच्या पिचवर त्यांना खेळण्यास न्यूझीलंडच्या बॅटर्सची मोठी परीक्षा असेल.
IND vs NZ Test Series Live Streaming: पहिली टेस्ट कधी आणि कुठे पाहता येणार?
टीम इंडिया Playing 11 : मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), ऋद्धीमान साहा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, आणि इशांत शर्मा.
न्यूझीलंड Playing 11 : केन विलियमसन (कॅप्टन), टॉम लॅथम, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, विल यंग, हेनरी निकोलस, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टीम साऊदी एयाज पटेल आणि विल्यम सोमरविले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Cricket news, New zealand, Team india