कानपूर, 25 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरू होत आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं टी20 सीरिजमध्ये न्यूझीलंडचा 3-0 असा सरळ पराभव केला. आता टेस्ट सीरिजमध्येही क्लीन स्वीप देण्याच्या उद्देशानं भारतीय टीम मैदानात उतरणार आहे. टेस्ट टीमचा नियमित कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाचा कॅप्टन असेल.
राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच टेस्ट सीरिज आहे. टी20 सीरिजमधील कामगिरीची टेस्टमध्येही पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कानपूरमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. टीम इंडियानं कानपूरमध्ये शेवटच्या 6 पैकी 5 टेस्ट जिंकल्या आहेत. भारतीय टीमचा यापूर्वी 1983 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाला होता. त्यानंतर गेल्या 38 वर्षांपासून भारतीय टीम कानपूरमध्ये अजिंक्य आहे.
किती वाजता सुरू होणार मॅच?
भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिली टेस्ट 25 नोव्हेंबर रोजी गुरूवारी कानपूरमध्ये सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस सकाळी 9 वाजता होईल.
कुठे होणार लाईव्ह प्रसारण?
या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.
IND vs NZ: पहिल्या टेस्टमध्ये विराटच्या जागेवर खेळणार 'हा' मुंबईकर, अजिंक्य रहाणेनं केलं जाहीर
दोन्ही देशांच्या टीम
टीम इंडिया: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रीकर भरत आणि प्रसिद्ध कृष्णा.
न्यूझीलंडची टीम : केन विलियमसन (कॅप्टन), टॉम लॅथम, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, विल यंग, हेनरी निकोलस, ग्लेन फिलिप्स, टिम साउदी, नील वॅगनर, डेरेल मिचेल, काइल जेमिसन, एयाज पटेल, मिचेल सँटनर, विल्यम सोमरविले आणि रचिन रवींद्र.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india