मुंबई, 27 जानेवारी : वेस्ट इंडिज विरूद्ध होणाऱ्या वन-डे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच वेस्ट इंडिज विरूद्ध खेळणार आहे. त्यामुळे रोहित-द्रविड जोडी यंदा कुणाचा आग्रह करते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वन-डे टीममध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दीपक हुडाचा (Deepak Hooda) समावेश करण्यात आला आहे. बडोदा टीमकडून तब्बल 11 वर्ष क्रिकेट खेळलेला हुडा आता राजस्थानकडून खेळत आहे. बडोद्याचा कॅप्टन कृणाल पांड्याबरोबर (Krunal Pandya) झालेल्या वादामुळे त्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
काय झाला होता वाद?
2021 च्या सुरूवातीला घडलेल्या घटनेमुळे दीपक हुडाचं आयुष्य बदललं.बडोदा टीमचा उपकर्णधार दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून माघार घेतली होती. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya)सोबत भांडण झाल्यामुळे हुडाने सय्यद मुश्ताक अलीमधून माघार घ्यायचा निर्णय घेतला. कृणाल पांड्याने आपल्याला शिव्या दिल्या, त्यामुळे आपण स्पर्धेतून माघार घेत आहोत, असा आरोप दीपक हुडाने केला होता.
कृणाल पांड्याने आपल्याला सरावापासून रोखलं आणि आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा दावा दीपक हुडाने केला होता. याबाबत त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ई-मेलही लिहिला, ज्यात त्याने कृणाल पांड्याबाबत तक्रार केली. कृणाल पांड्याने शिव्या दिल्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून माघार घेत असल्याचं त्याने जाहीर केलं. त्यानंतर हुडानं बडोदा सोडत राजस्थानकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियात 'रोहित राज्य', विराटने नाकारलेल्या खेळाडूचं कमबॅक!
का झाली निवड?
राजस्थानकडून खेळताना या सिझनमध्ये हुडानं जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (SMT) 6 मॅचमध्ये 73.50 च्या सरासरीनं 294 रन काढले. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट 168 होता. त्याने स्पर्धेत 23 फोर आणि 17 सिक्स लगावले.
दीपक हुडा अनेक कारणांमुळे टीम इंडियासाठी उपयुक्त आहे. हार्दिक पांड्या जखमी झाल्यानं भारतीय टीम फिनिशर्सच्या शोधात आहे. हा शोध हुडा पूर्ण करू शकतो. हुडा नंबर 4 ते 7 पर्यंत कुठेही खेळू शकतो. त्याच्यामध्ये सिक्स फोरसह आक्रमक इनिंग खेळण्याबरोबरच परिस्थितीनुसार एकेरी-दुहेरी रन करत स्कोअरबोर्ड हलता ठेवण्याची क्षमता आहे.
हुडा ऑफ स्पिनर देखील आहे. सहावा बॉलर म्हणून तो उपयुक्त आहे. तसेच तो उत्तम फिल्डर असून त्याचा फिटनेस देखील कमाल आहे. या सर्व बाजू त्याच्या निवडीमध्ये निर्णायक ठरल्या आहेत. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीला वन-डे टीमममध्ये एक पर्याय हुडामुळे मिळाला आहे.
वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, तीन नव्या चेहऱ्यांना संधी
भारताची वन-डे टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान
टी20 टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.