जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI : वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, तीन नव्या चेहऱ्यांना संधी

IND vs WI : वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, तीन नव्या चेहऱ्यांना संधी

IND vs WI : वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, तीन नव्या चेहऱ्यांना संधी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India Announce) मैदानात उतरत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 जानेवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India Announce) मैदानात उतरत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी दुखापत झाल्यामुळे रोहित खेळू शकला नव्हता. यानंतर फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर रोहितचा वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. लेग स्पिनर रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. याशिवाय कुलदीप यादवचं (Kuldeep Yadav) वनडे टीममध्ये पुनरागमन झालं आहे. रवी बिष्णोईशिवाय आवेश खान (Avesh Khan) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) हे टीम इंडियातले नवीन चेहरे आहेत. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा अजूनही फिट न झाल्यामुळे त्यांची टीम इंडियात निवड झाली नाही. तर दक्षिण आफ्रिकेत सगळ्या टेस्ट आणि वनडे खेळलेल्या बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. कोरोना झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ न शकलेल्या वॉशिंग्टन सुंदरला वनडे आणि टी-20 टीममध्ये निवडण्यात आलं आहे. आर.अश्विनलाही विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खराब कॅप्टन्सी केलेल्या केएल राहुलला उपकर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आलं आहे. 6 फेब्रुवारीला 3 वनडे मॅचच्या सीरिजपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरूवात होईल. यानंतर 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाईल. कोरोना व्हायरसमुळे वनडे सीरिज अहमदाबादमध्ये तर टी-20 सीरिज कोलकात्यामध्ये होणार आहे.

जाहिरात

भारताची टी-20 टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल वनडे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात