जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI : टीम इंडियात 'रोहित राज्य', विराटने नाकारलेल्या खेळाडूचं कमबॅक!

IND vs WI : टीम इंडियात 'रोहित राज्य', विराटने नाकारलेल्या खेळाडूचं कमबॅक!

IND vs WI : टीम इंडियात 'रोहित राज्य', विराटने नाकारलेल्या खेळाडूचं कमबॅक!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये (Team India) मोठे बदल होणार आहेत. 6 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या तीन वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे, यानंतर दोन्ही टीममध्ये 3 टी-20 मॅचची सीरिज होईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 जानेवारी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये (Team India) मोठे बदल होणार आहेत. 6 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या तीन वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे, यानंतर दोन्ही टीममध्ये 3 टी-20 मॅचची सीरिज होईल. या सीरिजसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. निवड समितीने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) एनसीएमध्ये चर्चा केली आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकलेला रोहित शर्मा पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा मर्यादित ओव्हरचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच सीरिज असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी लेग स्पिनर रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याची पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये निवड होईल, तर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी माहितू सूत्रांनी दिली आहे. ‘कुलदीप यादव टीममध्ये कमबॅक करतोय, तर रवी बिष्णोईला पहिल्यांदाच संधी देण्यात येत आहे,’ असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं. रवी बिष्णोईने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून उल्लेखनीय कामगिरी केली. यंदाच्या आयपीएल मोसमात बिष्णोई लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल. दक्षिण आफ्रिकेत खराब कामगिरी केल्यानंतरही भुवनेश्वर कुमारला वनडे सीरिजमध्ये संधी दिली जाईल, पण टी-20 मधून मात्र त्याला डच्चू दिला जाईल. माजी कर्णधार विराट कोहली मात्र वनडे आणि टी-20 या दोन्ही सीरिज खेळेल, असं बीसीसीआय अधिकारी म्हणाला. विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या राज्यात कुलदीप यादवने त्याचा फॉर्म गमावला, यानंतर त्याला टीममधूनही बाहेर करण्यात आलं. निवड समितीला कुलदीप यादव एक्स-फॅक्टर वाटत आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कुलदीपच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय बॉलर्सना मधल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्यात अपयश आलं. धोनी कर्णधार असताना कुलदीप आणि युझवेंद्र चहल यांच्या जोडीने मधल्या ओव्हर्समध्येच भारताला मोठ्या प्रमाणावर विकेट मिळवून दिल्या होत्या, त्यामुळे टीमचा अनेकवेळा विजय झाला. आता पुन्हा एकदा कुलदीपकडून अशाच कामगिरीची टीम आणि निवड समितीला अपेक्षा आहे. 6 फेब्रुवारीला 3 वनडे मॅचच्या सीरिजपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरूवात होईल. यानंतर 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाईल. कोरोना व्हायरसमुळे वनडे सीरिज अहमदाबादमध्ये तर टी-20 सीरिज कोलकात्यामध्ये होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात