मुंबई, 28 फेब्रुवारी : टीम इंडियानं श्रीलंकेविरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये 3-0 असा विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 मध्ये भारताने श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 6 विकेट्सनं पराभव केला. यापूर्वी वेस्ट इंडिज विरूद्धची टी20 सीरिज देखील टीमनं 3-0 या फरकानं जिंकली होती. आगामी टी20 वर्ल्ड कपचा विचार करता या दोन्ही सीरिजमधील विजय महत्त्त्वाचे आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये भारतीय टीममधील तरूण खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. 5 खेळाडू या विजयाचे शिल्पकार ठरले. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer): श्रेयसनं श्रीलंकेविरूद्धच्या तीन्ही मॅचमध्ये अर्धशतक झळकावली. तो संपूर्ण सीरिजमध्ये एकदाही आऊट झाला नाही. त्याने सर्वात जास्त 204 रन केले. या सीरिजमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 170 पेक्षा जास्त होता. वेस्ट इंडिज विरूद्ध त्याला फक्त एक मॅच संधी मिळाली. त्यामध्ये त्याने 25 रन केले. इशान किशन (Ishan Kishan): इशान किशनच्या बॅटींगवर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याने श्रीलंकेविरूद्ध जोरदार कमॅबॅक केले. इशाननं 2 मॅचमध्ये 105 रन केले. दुखापतीमुळे तो तिसरी मॅच खेळू शकला नाही. त्यानं पहिल्या मॅचमध्ये 89 रनची मोठी खेळी केली होती. त्याचा या सीरिजमधील स्ट्राईक रेट 148 होता. यापूर्वी वेस्ट इंडिज विरूद्ध त्याने 3 मॅचमध्ये फक्त 71 रन केले होते. IND vs SL : विजयानंतर कॅप्टन रोहितचा सहकाऱ्यांना खास मेसेज, टीममधील जागा… सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) : सूर्यकुमार दुखापतीमुळे श्रीलंकेविरूद्धची टी20 सीरिज खेळू शकला नाही. वेस्ट इंडिज विरूद्धची सीरिज जिंकण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने 54 च्या सरासरीनं भारताकडून सर्वात जास्त 107 रन केले. 65 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. सूर्यानं 195 च्या स्ट्राईक रेटनं रन केले. व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) : तरूण ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यरनं वेस्ट इंडिज विरूद्ध बॅट आणि बॉल दोन्हीनं कमाल केली. त्याने 3 इनिंगमध्ये 92 च्या सरासरीनं 92 रन केले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 184 होता. त्याचबरोबर त्याने 2 विकेट्सही घेतल्या. श्रीलंका विरूद्ध त्याला फक्त एक इनिंग बॅटींगची संधी मिळाली. यामध्ये त्याने 5 रन काढले. तसंच संपूर्ण सीरिजमध्ये 2 विकेट्स घेतल्या. Women’s World Cup : पाकिस्तान विरूद्धच्या मॅचपूर्वी टीम इंडियासाठी Good News रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) : लेग स्पिनर रवी बिश्नोईला वेस्ट इंडिज विरूद्ध टी20 सीरिजमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने 3 मॅचमध्ये 25 च्या सरासरीनं 3 विकेट्स घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट 6.33 होता. श्रीलंका विरूद्ध त्याने फक्त 1 मॅच खेळली आणि एक विकेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







