मुंबई, 28 फेब्रुवारी : महिला वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी आता मोजकेच दिवस उरले आहेत. या वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी (Indian Women Cricket Team) चांगली बातमी आहे. टीमची प्रमुख बॅटर स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) वर्ल्ड कपसाठी फिट घोषित करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या वॉर्म-अप मॅचमध्ये शबनम इस्माइलचा बाऊन्सर स्मृतीच्या डोक्याला लागला होता. त्यानंतर स्मृतीला रिटायर हर्ट व्हावे लागले. भारताने ती मॅच 2 रननं जिंकली होती. आयसीसीच्या रिपोर्टनुसार, त्या घटनेनंतर डॉक्टरांनी स्मृतीची तपासणी केली आणि त्यानंतर मेतिला पुढे खेळण्यासाठी फिट घोषित केले होते. स्मृतीनं त्यानंतर दीड ओव्हर बॅटींग केली आणि ती रिटायर हर्ट झाली. मेडिकल रिपोर्टनुसार तिच्यामध्ये कनकशनचे कोणतेही लक्षण नाहीत. स्मृती सध्या चांगलीच फॉर्मात आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या शेवटच्या वन-डेमध्ये तिने 20 वे अर्धशतक झळकावले. स्मृतीनं आजवर 64 वन-डेमध्ये 4 शतकांच्या मदतीनं 2461 रन केले आहेत. टीम इंडियाता आता वेस्ट इंडिज विरूद्ध आणखी एक वॉर्म-अप मॅच खेळणार आहे. त्यानंतर सहा मार्च रोजी भारताची पहिली लढत पाकिस्तान विरूद्ध (India Women vs Pakistan Women) होणार आहे. या मॅचपूर्वी स्मृती फिट झाल्यानं टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. PSL Final : पाकिस्तानी बॉलरनं हात जोडून अंपायरला केली Out देण्याची विनंती, Video Viral टीम इंडियानं रविवारी झालेल्या वॉर्म-अप मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 244 रन केले होते. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी आफ्रिकेला 7 आऊट 242 रनवर रोखत विजय मिळवला आहे. भारताकडून या मॅचमध्ये राजेश्वरी गायकवाडनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाकडून व्हाईस कॅप्टन हरनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) शतक झळकावलं. हरमननं 114 बॉलमध्ये 103 रनची खेळी केली. गेल्या काही दिवसांमध्ये खराब फॉर्ममुळे हरमननवर टीका होत होती. तिच्या टीममधील जागेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. न्यूझीलंड विरूद्धच्या शेवटच्या वन-डेमध्ये तिने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर वॉर्मअप मॅचमध्ये शतक झळकावले. हरमन फॉर्ममध्ये परतल्यानं टीम इंडियाची मोठी डोकेदुखी दूर झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







