जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : विजयानंतर कॅप्टन रोहितचा सहकाऱ्यांना खास मेसेज, टीममधील जागा...

IND vs SL : विजयानंतर कॅप्टन रोहितचा सहकाऱ्यांना खास मेसेज, टीममधील जागा...

IND vs SL : विजयानंतर कॅप्टन रोहितचा सहकाऱ्यांना खास मेसेज, टीममधील जागा...

भारतीय क्रिकेट टीमचे विजयी अभियान कायम आहे. टीम इंडियानं रविवारी श्रीलंकेचा तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात (IND vs SL 3rd T20I) 6 विकेट्सनं पराभव केला. या विजयानंतर कॅप्टन रोहितनं (Rohit Sharma) टीमला खास मेसेज दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट टीमचे विजयी अभियान कायम आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियानं रविवारी श्रीलंकेचा तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात (IND vs SL 3rd T20I) 6 विकेट्सनं पराभव केला. श्रीलंकेनं 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 146 रन केले. भारताने 147 रनचं लक्ष्य 19 बॉल आणि 6 विकेट्स राखत पूर्ण केले. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 45 बॉलमध्ये 73 रनची नाबाद खेळी केली, तर रवींद्र जडेजाही 15 बॉलमध्ये 22 रनवर नाबाद राहिला. रोहित शर्मानं तिसऱ्या टी20 मॅचमधील प्लेईंग 11 मध्ये 4 बदल केले होते. रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. श्रेयस अय्यरचं तीन टी-20 मॅचच्या या सीरिजमधलं हे तिसरं अर्धशतक होतं. याआधी त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 57 रन आणि नाबाद 74 रनची खेळी केली होती. जडेजानं झटपट 22 रन करत त्याला साथ दिली. या मॅचनंतर बोलताना रोहितनं सांगितलं की, ‘आम्ही चांगला खेळ केला. या सीरिजमधून अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या. आमची बेंच स्ट्रेंथ किती मजबूत आहे, हे आम्हाला पाहायचं होतं. त्या सर्व खेळाडूंना संधी देणे आवश्यक होते. खेळाडूंना त्यांच्या जागेची पर्वा करू नये, हे त्यांना समजणे आवश्यक आहे. PSL ला मिळाला नवा चॅम्पियन, आफ्रिदीनं केला वर्ल्ड रेकॉर्ड टीममधील कमतरता पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याची खबरदारी घेऊनच आम्हाला पुढील वाटचाल करायची आहे. आता श्रीलंकेविरूद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज होईल. ही सीरिज म्हणजे मोठे आव्हान आहे. पण खेळाडू फॉर्मात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मोहालीमध्ये गेल्यानंतर आम्ही टेस्टचा विचार सुरू करू.’ भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सीरिजला 4 मार्चपासून मोहालीमध्ये सुरूवात होत आहे. या सीरिजपासून रोहित शर्माची टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून ही पहिलीच सीरिज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात