मुंबई, 28 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीम श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन वन-डे मॅच खेळणार आहे. ही सीरिज 3 जानेवारी 2023 पासून सुरू होत असून, 15 जानेवारी 2023 पर्यंत चालणार आहे. या सीरिजसाठी रोजी भारतीय टीमची निवड करण्यात आली असून, यामध्ये ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे पंतच्या टी20 कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण पंतची टी-20 आणि वन -डे अशा दोन्ही टीममध्ये निवड करण्यात आली नाही. दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये शेवटच्या मॅचमध्ये के. एल. राहुल कॅप्टन म्हणून खेळला होता. मात्र आता बीसीसीआयनं श्रीलंकेविरुद्ध जाहीर केलेल्या वन-डे टीममध्ये राहुल याचा विकेटकीपर म्हणून समावेश केलाय. याचाच अर्थ, राहुलला बॅटर म्हणून टीममध्ये स्थान दिलेलं नाही. विशेष म्हणजे 2023 मध्ये वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा भारतातच होणार असून त्याची तयारी भारतीय टीमनं सुरू केली आहे. श्रीलंकेविरुद्ध टीम जाहीर केल्यानंतर बीसीसीआयनं जारी केलेल्या निवेदनात कोणत्या खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे, आणि कोणाला वगळण्यात आलं आहे, याचा उल्लेख केलेला नाही. खेळाडूंना वगळण्याचं कारणही सांगितलेलं नाही. पेस बॉलर जसप्रीत बुमराह आणि ऑल राउंडर रवींद्र जडेजा हे दोघे श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमधून पुनरागमन करतील, अशी अपेक्षा होती. पण या दोघांनाही टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. तसंच त्यांच्या दुखापतीबाबत बोर्डाकडून कोणतंही अपडेट देण्यात आलेलं नाही. RSS बद्दल बोलून अडकला जडेजा, ट्रोलर्सनी केला हल्लाबोल! पंतची कामगिरी जेमतेम 2022 च्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीवर नजर टाकली, तर ऋषभ पंतने 25 मॅचमध्ये 21 इनिंगमध्ये 21 च्या सरासरीनं 364 रन केलेत. त्यामध्ये एका हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. त्याचा, या वर्षीचा टी-20 मधील स्ट्राइक रेट 133 होता. दुसरीकडे, के. एल. राहुलने 16 इनिंगमध्ये 29 च्या सरासरीनं 434 रन केलेत. त्यानं 6 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. राहुलचा स्ट्राइक रेट 127 होता. मात्र, मोठ्या टीमविरुद्ध राहुलला चांगली कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याची कामगिरी सरासरीपेक्षा कमी होती. राहुलचा संघर्ष 2022 मधील वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीवर नजर टाकली, तर ऋषभ पंतने 10 इनिंगमध्ये 37 च्या सरासरीनं 336 रन काढलेत. यामध्ये 1 शतक आणि 2 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. तर, के. एल. राहुलची कामगिरी या वर्षी खूपच खराब झाली. त्यानं 9 इनिंगमध्ये 28 च्या सरासरीनं 251 रन काढलेत. त्याला फक्त 2 हाफ सेंच्युरी झळकावता आल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनची श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये अतिरिक्त विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानं 2022 मध्ये वन-डे क्रिकेटमध्ये 7 इनिंगमध्ये 60 च्या सरासरीनं 417 रन काढलेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. IPL 2023च्या आयोजनात ICCच्या नियमाचा अडथळा, BCCIसमोर तयारीचा पेच श्रीलंकेच्या सीरिजसाठी निवडण्यात आलेली टीम इंडिया टी 20 टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), सूर्यकुमार यादव (उप कॅप्टन), राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, दीपक हुडा, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीपसिंग, शिवम मावी, मुकेश कुमार, उमरान मलिक, हर्षल पटेल. वन-डे टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप कॅप्टन), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीपसिंग, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.