मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहित शर्माला टेस्ट टीमचा कॅप्टन करण्याची तयारी! वाचा BCCI चा खास प्लॅन

रोहित शर्माला टेस्ट टीमचा कॅप्टन करण्याची तयारी! वाचा BCCI चा खास प्लॅन

ओमिक्रॉनच्या (Omicron) संकटानंतरही टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India tour of South Africa) होणार आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं रोहित शर्माला (Rohit Sharma) नवी जबाबदारी देण्याची तयारी सुरू झाली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 5 डिसेंबर: ओमिक्रॉनच्या (Omicron) संकटानंतरही टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India tour of South Africa) होणार असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. बीसीसीआयनं ही घोषणा करताच या दौऱ्यासाठी जाणाऱ्या टीम इंडियाची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या 2 वर्षांपासून फॉर्मसाठी झगडत आहे. मुंबई टेस्टमध्ये त्याला दुखापतीमुळे त्याला खेळवण्यात आलं नाही असं कारण टीम मॅनेजमेंटने दिले होते. पण, रहाणेचा फॉर्म पाहता यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. या बैठकीत  रोहित शर्माला (Rohit Sharma) टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन करण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती बीसीसीआयशी संबंधित एका अधिकाऱ्यानं दिली आहे. रोहित सध्या टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन असून लवकरच वन-डे टीमचा कॅप्टन होण्याचीही शक्यता आहे. टेस्ट टीमचं नेतृत्त्व हे विराट कोहलीच्या (Virat Kohli) हाती आहे. पण, रोहितला या टीमचा व्हाईस कॅप्टन करुन निवड समिती त्याला भविष्यात कॅप्टन करण्याची तयारी सुरू करणार आहे. रहाणेची जागा धोक्यात? अजिंक्य रहाणेनं विराटच्या अनुपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट टीमची कॅप्टनसी सांभाळली होती. त्या सीरिजमध्ये टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला.  पण, एक बॅटर म्हणून अजिंक्य सातत्यानं अपयशी होत आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कानपूर टेस्टमध्ये त्याला चांगली संधी होती. पण, या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये तो अपयशी ठरला. IND vs NZ: एजाझच्या 10 विकेट्सवर इतरांचं पाणी, न्यूझीलंडवर ओढावली मोठी नामुश्की रहाणेनं गेल्या वर्षभरात 14 टेस्टमध्ये 24.66  च्या सरासरीनं 592 रन केले आहेत. त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील एकूण सरासरीपेक्षा ही आकडेवारी बरीच कमी आहे. रहाणेच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला कानपूर टेस्टमध्ये विजय मिळवण्यात अपयश आले. कानपूरमधील दोन्ही इनिंगमध्ये मिळून त्यानं 39 रन केले होते. त्यामुळे त्याची टीम इंडियातील जागा धोक्यात आली आहे.
First published:

Tags: Ajinkya rahane, Cricket news, Rohit sharma, Team india

पुढील बातम्या