जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: एजाझच्या 10 विकेट्सवर इतरांचं पाणी, न्यूझीलंडवर ओढावली मोठी नामुश्की

IND vs NZ: एजाझच्या 10 विकेट्सवर इतरांचं पाणी, न्यूझीलंडवर ओढावली मोठी नामुश्की

IND vs NZ: एजाझच्या 10 विकेट्सवर इतरांचं पाणी, न्यूझीलंडवर ओढावली मोठी नामुश्की

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टवर टीम इंडियानं मजबूत पकड मिळवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टवर टीम इंडियानं मजबूत पकड मिळवली आहे. मुंबई टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा पूर्वार्ध न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) गाजवला. त्यानं एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.  या ऐतिहासिक कामगिरीवर त्याच्याच टीमनं पाणी ओतलं आहे. टीम इंडियाच्या भेदक बॉलिंगपुढे न्यूझीलंडला संपूर्ण दिवसही बॅटींग करता आली नाही. टीम इंडियाची पहिली इनिंग 325 रनवर संपुष्टात आली होती. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम फक्त 62  रनवर ऑल आऊट झाली. टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची ही टीम इंडिया विरुद्धची सर्वात कमी धावसंख्या आहे. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 263 रनची आघाडी घेतली. त्यानंतरही न्यूझीलंडवर फॉलो ऑन न लादण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला . न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) तीन झटपट विकेट्स घेतल्या. कानपूर टेस्टमध्ये  सिराजला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मुंबई टेस्टटपूर्वी इशांत शर्मा जखमी झाल्यानं सिराजचा प्लेईंग 11 मध्ये समावेश झाला. सिराजनं दिलेल्या सुरुवातीचा फायदा भारतीय स्पिनिर्सनी घेतला.  अक्षर पटेल (Axar Patel), आर. अश्विन (R. Ashwin) आणि जयंत यादव (Jayant Yadav) या तिन्ही स्पिनर्सनी प्रत्येकी एक विकेट्स घेत टी टाईमला न्यूझीलंडची अवस्था 6 आऊट 38 केली होती.टी टाईमनंतर आर. अश्विननं न्यूझीलंडच्या लोअर ऑर्डरला संघर्ष करू दिला नाही. त्यानं झटपट 3 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेलनं कायले जेमिसनला आऊट केले. न्यूझीलंडची पहिली इनिंग 62 रनवर संपुष्टात आली.

जाहिरात

टीम इंडियाकडून आर. अश्विन सर्वात यशस्वी बॉलर ठरला त्यानं 4 विकेट्स घेतल्या. सिराजनं 3 विकेट्स देत त्याला उत्तम साथ दिली. अक्षर पटेल आणि जयंत यादव यांनी अनुक्रमे 2 आणि 1 विकेट घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात