Home /News /sport /

IND vs SA : राहुलच्या कॅप्टनसीवर पंजाबचा कोच नाराज, टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर घेतला आक्षेप

IND vs SA : राहुलच्या कॅप्टनसीवर पंजाबचा कोच नाराज, टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर घेतला आक्षेप

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट आफ्रिकेनं 7 विकेट्सनं जिंकली. या टेस्टमधील केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीवर पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) कोचनं आक्षेप घेतला आहे.

    मुंबई, 8 जानेवारी :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट आफ्रिकेनं 7 विकेट्सनं जिंकली. दक्षिण आफ्रिकेनं 240 रनचे लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. कॅप्टन डीन एल्गारने (Dean Elgar) नाबाद 96 रन काढले. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पाठदुखीमुळे खेळू शकला नाही. विराटच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कॅप्टन होता. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडियाला विराटची अनुपस्थिती जाणवली. टीम इंडियाने मैदानात विराटची एनर्जी मिस केली असं मत  माजी क्रिकेटपटू वासिम जाफरनं (Wasim Jaffer) व्यक्त केले. 'इनसाईड क्रिकेट' शी बोलताना जाफरने हे मत व्यक्त केले. केएल राहुलमध्ये एक कॅप्टन म्हणून पहिल्या टेस्टमध्ये तो जोश नव्हता, असा दावा जाफरने केला आहे. जाफर पंजाब किंग्ज (Punjab Kings) या आयपीएल टीमचा बॅटींग कोच आहे. तर राहुल मागील दोन सिझन पंजाबचा कॅप्टन होता. आगामी आयपीएल सिझनसाठी तो पंजाबच्या टीममधून बाहेर पडला आहे. 'टीम इंडियाने कॅप्टन विराट कोहलीला नक्कीच मिस केले. तो मैदानात नेहमी आक्रमक असतो. खेळाडूंनी चूक केली तर त्याला मैदानात उत्तर द्यावं लागेल, अशा प्रकारचा विराट हा खेळाडू आहे. टीम इंडियाने विराटची एनर्जी मिस केली.' असे जाफरने सांगितले. त्याचबरोबर केएल राहुल हा कॅप्टन पदासाठी योग्य पर्याय नव्हता, असे मत जाफरने व्यक्त केले आहे. 'मला टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाचा धक्का बसला. तुमच्याकडे अजिंक रहाणे (Ajinkya Rahane) हा पर्याय होता. ज्याने कॅप्टन म्हणून आजवर एकही टेस्ट मॅच हरलेली नाही. त्याने ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकली आहे. तरीही राहुलला कॅप्टन करण्याची काय गरज होती? ' असा प्रश्न जाफरनं विचारला आहे. IND vs SA : केपटाऊन टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का, महत्त्वाचा खेळाडू होणार आऊट! जाफर पुढे म्हणाला, 'मी राहुलच्या विरुद्ध नाही. तो तरूण आहे. त्याने पंजाब किंग्जची कॅप्टनसी केली आहे. तो भविष्यातील कॅप्टन समजला जातो. पण, माझ्या मते विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेनं कॅप्टनसी करायला हवी होती.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket news, Kl rahul, Team india

    पुढील बातम्या