मुंबई, 8 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तीन टेस्ट मॅचची सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने सेंच्युरियन टेस्ट जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेतली होती. त्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेनं जोहान्सबर्ग टेस्टमध्ये बरोबरी साधली आहे. आता या सीरिजचा निर्णय केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमला कोणत्याही परिस्थितीमध्ये केपटाऊनमध्ये होणारी तिसरी टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. ही टेस्ट जिंकण्याच्या टीम इंडियाच्या तयारीला धक्का बसला आहे. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) केपटाऊन टेस्टमध्ये खेळणे अनिश्चित आहे. सिराजला जोहान्सबर्ग टेस्टच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने दुसऱ्या टेस्टमध्ये फारशी बॉलिंगही केली नाही. तो तिसऱ्या टेस्टमध्ये खेळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याने स्पष्ट केले आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यातील विजयात सिराजचा महत्त्वाचा वाटा होता. सेंच्युरियन टेस्टमध्येही सिराजने योगदान दिले होते. सिराज बॉलिंगसाठी फिट नसल्याने आम्हाला फटका बसला, असा दावा द्रविडनं केला आहे. आता निर्णयाक टेस्टपूर्वी सिराज अनफिट झाल्यानं टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. सिराजला इशांत शर्मा (Ishan Sharma) आणि उमेश यादव (Umesh Yadav) हे दोन पर्याय टीम इंडियाकडे आहेत. Match Fixing: पाकिस्तान दौऱ्यातील घटनेचा शेन वॉर्ननं केला खुलासा, 28 वर्षांनंतर सांगितला ‘तो’ किस्सा सिराजच्या जागी विराट? केपटाऊन टेस्टला 11 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) कमबॅक निश्चित आहे. विराट पाठदुखीमुळे दुसरी टेस्ट खेळू शकला नव्हता. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारताची बॅटिंग अपयशी ठरली, त्यामुळे 7 बॅटर आणि 4 बॉलर खेळवण्याचा निर्णय झाला तर सिराजची जागाच विराट घेऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.