मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: रोहित-द्रविड युगाची होणार आज सुरूवात, टीम इंडिया करणार अनेक प्रयोग

IND vs NZ: रोहित-द्रविड युगाची होणार आज सुरूवात, टीम इंडिया करणार अनेक प्रयोग

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील T20 सीरिजला बुधवारी सुरूवात होणार आहे. (फोटो -BCCI)

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील T20 सीरिजला बुधवारी सुरूवात होणार आहे. (फोटो -BCCI)

टी20 वर्ल्ड कपमध्ये पराभव सहन केल्यानंतर टीम इंडिया आज (बुधवारी) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच मॅच आहे.

  • Published by:  News18 Desk

जयपूर, 17 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये पराभव सहन केल्यानंतर टीम इंडिया आज (बुधवारी) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच मॅच आहे. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी20 मॅचच्या या सीरिजमध्ये नव्या दमानं सुरूवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. आगामी टी20 वर्ल्ड कपला फक्त 11 महिने बाकी आहेत. त्यामुळे या वर्ल्ड कपसाठी मजबूत टीम तयार करण्यावर रोहित-द्रविड जोडीचा भर असेल.

हार्दिकचा पर्याय शोधणार

टी20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर फास्ट बॉलर ऑल राऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) पर्यायाचा शोध घेणे सुरू झाले आहे. पांड्या अजूनही पूर्ण फिट नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या व्यंकटेश अय्यरकडं (Venkatesh Iyer) हार्दिकचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. तो ही अपेक्षा पूर्ण करतो की नाही हे या सीरिजमध्ये समजेल.

आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड, युजवेंद्र चहल हर्षल पटेल आणि आवेश खान यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. चहलला वर्ल्ड कप टीममधून वगळण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. आता टीममध्ये त्याचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर बुमराहला या स्पर्धेत आराम देण्यात आला आहे. त्यामुळे 140 किलो मीटर प्रती तास वेगाने बॉलिंग करणाऱ्या फास्ट बॉलरचाही या सीरिजमध्ये शोध घेण्यात येणार आहे.

आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांच्या कामगिरीवर टीम मॅनेजमेंटची विशेष नजर असेल. त्यांच्याकडं असलेल्या अतिरिक्त स्पीडचा टीमला फायदा होऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीचा विचार करून टीम तयार करण्यावर राहुल द्रविडचा भर असेल. या टीममध्ये 5 ओपनिंग बॅटर्सचा समावेश आहे. त्यांपैकी काही जणांना मिडल ऑर्डरमध्ये खेळवणे हे देखील आव्हानात्मक काम आहे.

IND vs NZ : रोहितची पहिली परीक्षा, या Playing XI सह मैदानात उतरणार हिटमॅन!

रोहित शर्मा आणि केएल राहुल हेच टीम इंडियाच्या इनिंगची सुरूवात करतील. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड हे अतिरिक्त पर्याय असल्यानं टीम इंडिया काही प्रयोग करण्याचीही शक्यता आहे. व्यंकटेश अय्यरनं आयपीएल स्पर्धेत सर्व रन ओपनिंगला काढले होते. पण, इथं त्याला मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्यात येईल. टी20 वर्ल्ड कपमध्ये फार कमाल न केलेल्या सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात येणार आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india