जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ : रोहितची पहिली परीक्षा, या Playing XI सह मैदानात उतरणार हिटमॅन!

IND vs NZ : रोहितची पहिली परीक्षा, या Playing XI सह मैदानात उतरणार हिटमॅन!

IND vs NZ : रोहितची पहिली परीक्षा, या Playing XI सह मैदानात उतरणार हिटमॅन!

भारताच्या टी-20 क्रिकेटमध्ये बुधवारपासून नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand T20 Series) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजची पहिली मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर 16 ऑक्टोबर : भारताच्या टी-20 क्रिकेटमध्ये बुधवारपासून नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand T20 Series) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजची पहिली मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीमचं नेतृत्व गेलं आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. सुपर-12 स्टेजमध्येच टीम इंडियाला बाहेर जावं लागलं. यानंतर टीम निवडीवर आणि टीमच्या संतुलनावरही प्रश्न उपस्थित झाले. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीमची कामगिरी खराब झाली असली, तरी पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे रोहित आणि राहुल द्रविड यांना टीम तयार करायला फार वेळ मिळणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासूनच रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना तयारी सुरू करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले. टी-20 वर्ल्ड कप खेळणारे 8 खेळाडू ही सीरिज खेळणार नाहीत. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर राहुल चहर, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना डच्चू मिळाला आहे. आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची सर्वाधिक निराशा ऑलराऊंडर आणि स्पिनरनी केली. हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा सस्पेन्स संपूर्ण वर्ल्ड कप कायम होता, ज्याचा फटका टीम इंडियाला बसला. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये हार्दिक पांड्याऐवजी व्यंकटेश अय्यरला संधी मिळाली आहे, तर युझवेंद्र चहलनेदेखील पुनरागमन केलं आहे. या दोघांना पहिल्या सामन्यापासूनच रोहित खेळवेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दुखापतीनंतर श्रेयस अय्यरंचही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. या खेळाडूंसह मैदानात उतरणार रोहित? रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात