जयपूर, 16 नोव्हेंबर : टीम इंडियाचा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) नवा टी-20 कॅप्टन रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) नेट सरावासाठी मैदानात उतरला. टीम इंडियाने सवाई मानसिंग स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) टी-20 सीरिजआधी सराव केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. राहुल द्रविडसोबत पारस म्हांब्रे आणि बॅटिंग कोच विक्रम राठोडही सहभागी झाले. यावेळी कर्णधार रोहित शर्मा म्हांब्रे आणि राठोड यांच्यासोबत चर्चा करताना दिसला.
सराव सत्रात आर.अश्विन, दीपक चहर, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, ईशान किशन, अक्षर पटेल सहभागी झाले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे, यानंतर दोन टेस्ट मॅचही खेळवल्या जाणार आहेत. पहिली टी-20 17 नोव्हेंबरला जयपूरमध्ये, दुसरी टी-20 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरी टी-20 21 नोव्हेंबरला कोलकात्यामध्ये होईल. यानंतर कानपूरमध्ये 25-29 नोव्हेंबरला पहिली टेस्ट आणि मुंबईत 3-7 डिसेंबरला दुसरी टेस्ट होईल.
New roles 👌 New challenges 👊 New beginnings 👍 Energies were high yesterday on Day 1 at the office for #TeamIndia T20I captain @ImRo45 & Head Coach Rahul Dravid. 👏 👏#INDvNZ pic.twitter.com/a8zlwCREhl
— BCCI (@BCCI) November 16, 2021
टीम इंडियाचं पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर लक्ष आहे, पण ही सीरिजही तितकीच महत्त्वाची आहे, असं केएल राहुल पत्रकार परिषदेत म्हणाला. पुढच्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम संतुलित करणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, पण सध्या आम्ही या सीरिजवरच लक्ष केंद्रित करत आहोत, अशी प्रतिक्रिया राहुलने दिली.
📸 📸: Some snapshots from #TeamIndia's 1⃣st practice session in Jaipur last evening. #INDvNZ pic.twitter.com/LcQsQVVNuR
— BCCI (@BCCI) November 16, 2021
— BCCI (@BCCI) November 16, 2021
बुधवारी रोहित शर्मा जेव्हा जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये टॉससाठी बाहेर पडेल तेव्हा टी-20 क्रिकेटमध्ये भारताच्या नव्या युगाला सुरुवात होईल. कर्णधाराशिवाय राहुल द्रविडचीही नवी परीक्षा सुरू होईल. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर आता टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कर्णधार आणि कोचच नाही तर नव्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. आयपीएल 2021 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेल, व्यंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि आवेश खान यांची टीममध्ये निवड झाली आहे. पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे रोहित आणि राहुल द्रविड यांना नव्याने टीमची बांधणी करावी लागणार आहे. या नवोदितांकडून कॅप्टन आणि कोचना बऱ्याच अपेक्षा असणार आहेत.
टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Rahul dravid, Rohit sharma, Team india