Home /News /sport /

IND vs NZ: रोहित शर्मानं एकाच मॅचमध्ये केले 6 मोठे रेकॉर्ड, विराट आणि बाबरची केली बरोबरी

IND vs NZ: रोहित शर्मानं एकाच मॅचमध्ये केले 6 मोठे रेकॉर्ड, विराट आणि बाबरची केली बरोबरी

रोहित शर्मानं (Rohit Sharma) टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून सुरूवात दमदार केली आहे. टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत (India vs New Zealand T20 Series 2021) शेवटच्या मॅचपूर्वीच विजयी आघाडी घेतली आहे.

    रांची, 20 नोव्हेंबर: रोहित शर्मानं (Rohit Sharma) टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून सुरूवात दमदार केली आहे. टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत (India vs New Zealand T20 Series 2021) शेवटच्या मॅचपूर्वीच विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या मॅचमध्ये 48 रन काढणाऱ्या रोहितनं रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये 55 रनचं योगदान दिलं. या मॅचमध्ये रोहितनं 6 मोठे रेकॉर्ड केले आहेत. पहिला रेकॉर्ड : 29 वे अर्धशतक रोहितनं शुक्रवारी टी20 इंटरनॅशनलमधील 29 वे अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहलीनंही ही कामगिरी 29 वेळा केली आहे. रोहितनं त्याची बरोबरी केली. रोहितनं आजवर 4 शतक आणि 25 अर्धशतक झळकावली आहेत. तर विराटला आजवर टी20 इंटरनॅशनलमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. दुसरं रेकॉर्ड : राहुलसोबत 5 वी शतकी भागिदारी रोहित शर्मानं शुक्रवारच्या मॅचमध्ये केएल राहुल सोबत शतकी भागिदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 रन जोडले. रोहित-राहुल जोडीची टी20 इंटरनॅशनलमधील ही 5 वी शतकी भागिदारी आहे. त्यांनी पहिल्या विकेटसाठी सर्वात जास्त शतकी भागिदारी करणाऱ्या बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) या जोडीची बरोबरी केली आहे. तिसरं रेकॉर्ड : 450 सिक्स पूर्ण रोहित शर्मानं 55 रनच्या खेळीत 5 सिक्स लगावले. त्याच्या नावावर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 454 सिक्स झाले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 450 सिक्स लगावणारा रोहित हा पहिला भारतीय बनला आहे. यापूर्वी ख्रिस गेल (Chris Gayle) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनी ही कामगिरी केली आहे. भारताचा 'जार्व्हो', मॅच सुरू असतानाच फॅन रोहितजवळ आला आणि... अशी होती हिटमॅनची रिएक्शन चौथं रेकॉर्ड : 50 रन झाल्यानंतर 25 वा विजय टी20 इंटरनॅशनलमध्ये 50 रनचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रोहितनं टीम इंडियाला 25 वा विजय मिळवून दिला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूला ही कामगिरी आजवर करता आलेली नाही. विराट कोहली 20 विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाचवा रेकॉर्ड : 13 वी शतकी भागिदारी रोहित शर्मानं टी20 इंटरनॅशनलमध्ये 13 व्या वेळेस शतकी भागिदारी केली आहे. हा देखील एक रेकॉर्ड आहे. त्यानं केएल राहुलसोबत 5 वेळा, शिखर धवनसोबत 4 वेळा, विराट कोहलीसोबत 3 वेळा आणि सुरेश रैनासोबत 1 वेळा शतकी भागिदारी केली आहे. IND vs NZ: 6 लगावण्याच्या नादात न्यूझीलंडच्या खेळाडूची तुटली बॅट, VIDEO VIRAL सहावा रेकॉर्ड : सर्वात कमी मॅचमध्ये 10 विजय रोहित शर्मानं भारतामध्ये कॅप्टन म्हणून सर्वात कमी वेळा 10 विजय मिळवले आहेत. रोहितच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 11 टी20 मध्ये 10 विजय मिळवले आहेत. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला 10 विजय मिळवण्यासाठी 15 मॅचपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Rohit sharma, Team india

    पुढील बातम्या