रांची, 20 नोव्हेंबर: टीम इंडियानं शुक्रवारी रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 7 विकेट्सनं पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय टीमनं 3 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं सुरूवात चांगली केली होती. पण, या सुरुवातीचा त्यांना फायदा घेता आला नाही. भारतीय बॉलर्सनं नियमित अंतरानं विकेट्स घेत न्यूझीलंडला 6 आऊट 153 रनवर रोखलं. टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) सेमी फायनलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या जिमी नीशमकडून (Jimmy Neesham) न्यूझीलंडला मोठी अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्ण करण्यात नीशम अपयशी ठरला. त्याला 18 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारनं आऊट केलं. त्यापूर्वी त्यानं 4 बॉलमध्ये फक्त 2 रन काढले होते. रन वेगानं होत नसल्यानं नीशम अस्वस्थ झाला होता. याच अस्वस्थतेतून मैदानात एक मजेशीर प्रसंग घडला. भुवनेश्वरच्या बॉलवर नीशमनं एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉल त्याच्या बॅटच्या खालच्या भागाला लागला. त्यामुळे बॅट तुटली आणि बॅटचा तुटलेला भाग भुवनेश्वरच्या डोक्यावरुन मैदानात पडला. त्यानंतर पुढच्याच बॉलला भुवनेश्वरनं नीशमला आऊट केलं. ऋषभ पंतनं त्याचा कॅच घेतला.
‘करो वा मरो’ मॅचमध्ये न्यूझीलंडची टीम मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरली. रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि डॅरेल मिचेल (Darell Mitchell) यांनी न्यूझीलंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोन्ही ओपनरमध्ये 4.2 ओव्हरमध्ये 48 रनची पार्टनरशीप केली, यानंतर मात्र न्यूझीलंडच्या दुसऱ्या कोणत्याच खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. Hitman चा भीष्म पराक्रम, हा विक्रम करणारा रोहित इतिहासातला पहिलाच भारतीय मार्टिन गप्टील आणि मिचेलनी प्रत्येकी 31-31 रनची खेळी केली, तर ग्लेन फिलिप्स 34 रन करून आऊट झाला. पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या. भुवनेश्वर, दीपक चहर, अश्विन आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.