रांची, 19 नोव्हेंबर : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते जगभरात आहेत, याचाच प्रत्यत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 (India vs New Zealand 2nd T20) वेळी आला. रांचीच्या मैदानात भारताची बॉलिंग सुरू असताना एक चाहता मैदानात आला आणि तो रोहितच्या पाया पडला. रोहितला पाया पडतानाचा त्याच्या चाहत्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याआधी भारताच्या इंग्लंड दौऱ्यातही जार्व्हो नावाचा चाहता वारंवार सुरक्षा भेदून मैदानात आला होता, यानंतर अखेर इंग्लंडमधल्या पोलिसांनी त्याला अटक केली, तसंच त्याच्या मैदानात येण्यावरही कायमची बंदी घालण्यात आली.
A die hard Rohit Sharma fan in Ranchi. pic.twitter.com/FyoE2BUZ5w
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2021
One cricket fan looking to touch the feet of Rohit Sharma. pic.twitter.com/eLLreW9567
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2021
विराट कोहलीनंतर आता रोहित शर्माकडे टीम इंडियाचं टी-20 फॉरमॅटचं नेतृत्व देण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधीच विराटने आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने जाहीर केलं होतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. सुपर-12 मध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. आता पुढचा टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये 11 महिन्यांमध्ये होणार आहे. याआधी रोहित शर्माला पुन्हा एकदा टीमची बांधणी नव्याने करावी लागणार आहे. रोहितच्या नावावर सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आहे. रोहित कॅप्टन असताना मुंबईने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या, त्यामुळे चाहत्यांना पुढच्या वर्षी हिटमॅनकडून टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीची अपेक्षा आहे.
पूर्णवेळ टी-20 टीमची कॅप्टन्सी घेतल्यानंतर रोहित शर्माची सुरुवात चांगली झाली. पहिल्याच टी-20 मध्ये टीम इंडियाने विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला 153 रनवर रोखलं.
रोहितने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि डॅरेल मिचेल (Darell Mitchell) यांनी न्यूझीलंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोन्ही ओपनरमध्ये 4.2 ओव्हरमध्ये 48 रनची पार्टनरशीप केली, यानंतर मात्र न्यूझीलंडच्या दुसऱ्या कोणत्याच खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. मार्टिन गप्टील आणि मिचेलनी प्रत्येकी 31-31 रनची खेळी केली, तर ग्लेन फिलिप्स 34 रन करून आऊट झाला. आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या. भुवनेश्वर, दीपक चहर, अश्विन आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Rohit sharma, T20 cricket, Team india