मुंबई, 6 जून : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आज वाढदिवस आहे. अजिंक्यनं आज 34 वर्षांचा झाला आहे. गेल्या दशकात भारतीय क्रिकेट टीमनं मिळवलेल्या अनेक ऐतिहासिक विजयात अजिंक्यचे मोलाचे योगदान आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 2020-21 साली टीम इंडियानं टेस्ट सीरिज जिंकली होती. त्या सीरिजमध्ये अजिंक्य भारतीय टीमचा कॅप्टन होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये त्यानं भारतीय टीमची कॅप्टनसी सांभाळली. अजिंक्यनं त्या सीरिजमधील मेलबर्न टेस्टमध्ये झुंजार शतक झळकावले होते. भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून एकाही टेस्टमध्ये पराभूत न होण्याचा रेकॉर्ड अजिंक्यच्या नावावर आहे. फिल्मी लव्हस्टोरी मैदानात अतिशय शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या अजिंक्यनं त्याची शाळेतली मैत्रिण राधिकाशी (Radhika) लग्न केले. या दोघांची लव्ह स्टोरीही एका बॉलिवूड कथेसारखीच आहे. अजिंक्य आणि राधिका लहानपणापासून एकाच कॉलनीत राहत होते. त्यांची शाळा आणि कॉलेज एकच होते. त्याचबरोबर दोघांच्या कुटुंबीयांची देखील परस्परांची चांगली ओळख होती. सततच्या सहवासातून दोघांमध्ये पहिल्यांदा मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गुपचुप सुरु होतं डेटिंग त्या काळात कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीनं राधिकाला डेटवर नेत होतो, अशी कबुली अजिंक्यनं यापूर्वी एका मुलाखतीमध्ये दिली होती. अर्थात त्यांचं हे गुपित फार काळ टिकलं नाही. दोघांच्याही घरच्यांना लवकरच ही बातमी समजली. त्यांनी आनंदानं त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर 26 डिसेंबर 2014 रोजी अजिंक्य आणि राधिकाचं लग्न झालं. अजिंक्यला मोठा क्रिकेटपटू झालेलं पाहणं हे दोन्ही परिवाराचं स्वप्न होतं. VIDEO: श्रीसंतला थप्पड मारल्याचा 14 वर्षानंतर हरभजनला पश्वाताप, म्हणाला… लग्नात रागावली होती राधिका! अजिंक्य रहाणे लग्नात झालेली चूक कधीही विसरु शकत नाही. लग्नाच्या वेळी तो त्याच्या नातेवाईकांसह राधिकाच्या घरी पोहचला तेंव्हा तिच्या घरातील मंडळी आश्चर्यचकित झाले होते. अजिंक्य त्यावेळी पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि जीन्स पँटमध्ये गेला होता. त्याला त्या कपड्यात पाहताच राधिका चांगलीच रागावली होती. अजिंक्य आजही ती त्याच्या आयुष्यातील मोठी चूक मानतो. वास्तविक अजिंक्यला व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाची शॉपिंग करायला वेळ मिळाला नव्हता. ‘रोहित शर्माला विश्रांतीची गरज नव्हती,’ माजी भारतीय क्रिकेटपटूचा दावा अजिंक्यनं विदेशातील खेळपट्टीवर नेहमीच लढाऊ खेळ केला आहे. विशेषत: ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजमध्ये सर्व आव्हान खंबीरपणे परतावणारा अजिंक्य आपण पाहिला आहे. या कामगिरीसाठी अजिंक्य नेहमी राधिकाला प्रेरणास्रोत समजतो. राधिका आपल्याला नेहमीच समजून घेतलं आहे, असं अजिंक्य सांगतो. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. राधिकाला साधं आयुष्य जगायला आवडतं. ती नेहमीच ग्लॅमर विश्वापासून दुर असते. तसंच सोशल मीडियावरही ती फार सक्रीय नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.