मुंबई, 5 जून : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून टी20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचं आगामी काळातील भरगच्च वेळापत्रक लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेसाठी रोहितला विश्रांती गरज नव्हती, असं मत टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर आर.पी.सिंहनं (RP Singh) व्यक्त केलं आहे.
आरपीनं 'इंडिया टीव्ही'शी बोलताना हे मत व्यक्त केलं. 'माझ्या मते त्यानं ही मालिका खेळायला हवी होती. विश्रांती घेणे आणि न घेणे ही वैयक्तिक बाब आहे. त्याला किती थकवा जाणवतोय त्यावर हे अवलंबून आहे. त्याला ब्रेकची गरज होती, असं मला वाटत नाही. त्यानं खेळायला हवं होतं. ही एक मोठी मालिका असून तो कॅप्टन आहे, हे त्यानं लक्षात ठेवायला हवं होतं.
रोहितसाठी आयपीएल 2022 निराशाजनक ठरलं. त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम शेवटच्या क्रमांकावर राहिली. रोहित बॅटर म्हणूनही या स्पर्धेत अपयशी ठरला. त्याला या सिझनमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. 48 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. रोहितनं 19.14 च्या सरासरीनं 268 रन केले. आरपी याबद्दल बोलताना म्हणाला की, 'रोहितनं गेल्या काही आयपीएल सिझनमध्ये 400 पेक्षा जास्त रन केले नाही. अन्य काही खेळाडूंनी देखील 400 चा टप्पा ओलांडला नाही. या सिझनमध्ये त्याची कामगिरी एकसमान नव्हती. पण तो काही मॅचमध्ये मॅच विनिंग खेळी खेळू शकला असता.'
सचिनला जखमी करायचं होतं म्हणून मुद्दाम हेल्मेटवर बॉल मारला! शोएब अख्तरची कबुली
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टीम : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rohit sharma, South africa, Team india