नवी दिल्ली, 06 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) या विषाणूने साऱ्या जगाला हादरून सोडले आहे. तब्बल 80 देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे तर, भारतात आतापर्यंत 31 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा परिणाम जगातील अनेक देशांच्या अर्थवस्थेवर झाला आहे. आता याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही होताना दिसत आहे. भारतात होणाऱ्या सर्वात मोठा इंडिनय प्रीमिअर लीगलाही याचा फटका बसला आहे. कोरोनामुळं बरेच परदेशी खेळाडू भारतात येण्यास तयार नाही आहेत. आयपीएलचा तेरावा हंगाम 29 मार्चपासून सुरू होईल. त्याआधी विदेशी खेळाडू माघार घेण्याच्या तयारीत आहेत. फक्त खेळाडूच नाही क्रिकेट बोर्डही खेळाडूंना इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी तयार नाही आहेत. अशीच चिंता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाव्हायरस संबंधित चिंता व्यक्त केली आहे. न्यूझीलंड बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आयपीएल दरम्यान ते आपल्या प्रत्येक खेळाडूला कोरोनाव्हायरस अपडेट देईल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह एकूण 6 खेळाडू आयपीएल 2020 खेळणार आहेत. न्यूझीलंड बोर्डानेही म्हटले आहे की ते बीसीसीआयच्या सल्लागारांचीही प्रतीक्षा करत आहेत. वाचा- कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती भारतात आतापर्यंत 31 रुग्ण सध्या भारतात कोरोनामुळे त्रस्त रूग्णांची संख्या 31 आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर २ रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला भेटायला आले होते. तर, 6550 फ्लाइटमधून आतापर्यंत 6,49,452 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे. वाचा- 12 वर्षानंतर बदलणार RCBचं नशीब! ‘हे’ 3 खेळाडू विराटला करणार IPL चॅम्पियन असा करणार खेळाडूंचा बचाव एका वृत्तसंस्थेशी बोलताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे पीआरओ रिचर्ड बुक यांनी आयपीएलमध्ये जाणाऱ्या खेळाडूंचा उल्लेख केला. बुक यांनी, “आम्ही पुरुष आणि महिला खेळाडूंना कोरोनव्हायरसबद्दल प्रत्येक अपडेट देत आहोत. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाययोजना करता येतील ते त्यांना सांगण्यात येत आहे. मंडळाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी परराष्ट्र, आरोग्य, व्यापार आणि क्रीडा मंत्रालयांच्या संपर्कात आहेत”, असे सांगितले. वाचा- CSKचा कर्णधार नसतो तर…, कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक न्यूझीलंडचे हे 6 खेळाडू खेळतात आयपीएल आयपीएलमध्ये न्यूझीलंडचे एकूण 6 खेळाडू आयपीएल खेळतात. यात जिमी नीशाम (किंग्स इलेव्हन पंजाब), लॉकी फर्ग्युसन (KKR), मिशेल मॅक्लेघन आणि ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियंस), केन विल्यम्सन (सनराइजर्स हैदराबाद) आणि मिशेल सेंटनर (चेन्नई सुपर किंग्स) या खेळाडूंचा समावेश आहे. वाचा- आला रे आला! रोहितचे ‘हे’ 5 शिलेदार मुंबईला पुन्हा एकदा करणार IPL चॅम्पियन BCCIने नेमणार सल्लागार समिती सध्या बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरू होणार्या आयपीएल आणि कोरोनाव्हायरसच्या संबंधित कोणतेही मार्गदर्शक सूचना देश-विदेशातील खेळाडूंना देण्यात आलेले नाहीत. वास्तविक, आयपीएल दरम्यान सेल्फी आणि ऑटोग्राफ घेणारे चाहते मोठ्या संख्येने आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी सल्ला आणि मार्गदर्शक सूचना जारी करू शकेल. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौर्यावर आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वीही खेळाडूंना कोणाशीही हात मिळवू नये असे सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.