नवी दिल्ली, 06 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Corona Virus) जगभरात हाहाकार माजला आहे. एकट्या चीनमध्ये आतापर्यंत 3 हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. भारतही यातून वाचू शकलेले नाही. भारतात सध्या 31 रुग्ण कोरोना संशयित आहेत. कोरोना विषाणूमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा आणि अनेक कार्यक्रम रद्द करावे लागत आहेत.
भारतात होणाऱ्या आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगलाही ग्रहण लागले आहे. मात्र आता कोरोनामुळे टी -20 प्रीमिअर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लीगमध्ये गेलसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कोरोना विषाणूचा क्रिकेटला बसलेला हा दुसरा मोठा झटका आहे.
वाचा-कोरोनाचा IPLला धोका; मुंबई, चेन्नई संघाचे ‘हे’ मुख्य खेळाडू खेळणार नाहीत?
ख्रिस गेल, संदीप लामिछाने आणि मोहम्मद शहजाद घेणार होते भाग
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार नेपाळची मोठी क्रिकेट स्पर्धा एव्हरेस्ट प्रीमियर लीग या महिन्यात 14 मार्चपासून होणार होती. परंतु आता कोरोना व्हायरसच्या तीव्रतेमुळे नेपाळ सरकारने ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल, नेपाळचा युवा गोलंदाज संदीप लामिछाने आणि अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजाददेखील सहभागी होणार आहेत. स्पर्धेला स्थिगिती दिल्यामुळे सर्व खेळाडू निराश झाले आहेत.
वाचा-कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
नेपाळमध्ये कोरोनाचा एक संशयित रुग्ण सापडला
एव्हरेस्ट प्रीमियर लीगच्या आयोजकांनी एक निवेदन जारी केले आहे की अटी अनुकूल झाल्याबरोबर स्पर्धा आयोजित केली जाईल. नेपाळमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एक संशयित रुग्ण सापडला आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने लोकांना व्हायरसचा प्रसार होण्याची अपेक्षा असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी कोरोना विषाणूमुळे यावर्षी जुलैपासून जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धासुद्धा धोक्यात आली आहे.
वाचा-कोरोनाचा हाहाकार! भारतात रुग्णांची संख्या पोहचली 31 वर, तिघांवर यशस्वी उपचार
IPLवरही कोरोनाचे सावट
फक्त खेळाडूच नाही क्रिकेट बोर्डही खेळाडूंना इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी तयार नाही आहेत. अशीच चिंता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाव्हायरस संबंधित चिंता व्यक्त केली आहे. न्यूझीलंड बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आयपीएल दरम्यान ते आपल्या प्रत्येक खेळाडूला कोरोनाव्हायरस अपडेट देईल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह एकूण 6 खेळाडू आयपीएल 2020 खेळणार आहेत. न्यूझीलंड बोर्डानेही म्हटले आहे की ते बीसीसीआयच्या सल्लागारांचीही प्रतीक्षा करत आहेत.