मुंबई, 29 एप्रिल: आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Delhi Capitals vs Kolkata Knight Riders) 4 विकेट्सनं पराभव केला. दिल्लीच्या विजयासह सध्या क्रिकेट जगतात दिल्लीच्या खेळाडूची ‘गोकू स्टाईल’ ची चर्चा अधिक रंगली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल 2022 मधील आपल्या आठव्या सामन्यात दिल्लीने पहिल्यांदाच चेतन सकारियाला (Chetan Sakariya) प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले होते. त्यानेही या संधीचे सोने करताना संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन चर्चेत आले आहे. कोलकाताकडून ऍरॉन फिंच (Aaron Finch) आणि वेंकटेश अय्यर सलामीला फलंदाजीसाठी आले होते. परंतु डावातील दुसरे आणि स्वत:चे पहिलेच षटक टाकत असलेल्या सकारियाने लवकरच ही जोडी तोडली. त्याने आपल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर फिंचला 3 धावांवर त्रिफळाचीत केले. IPL 2022 : मागच्या सिझनमध्ये हिरो, यंदा झिरो! 2 खेळाडूंच्या फ्लॉप शो मुळे KKR अडचणीत सामन्यातील आणि चालू हंगामातील पहिली विकेट घेतल्यानंतर सकारियाने खास अंदाजात त्याने सेलिब्रेशन (Chetan Sakariya Celebration) केले. गोकू स्टाईल’ सेलिब्रेशन त्याने जपानी ऍक्शन कार्टून सिरीज ड्रॅगन बॉल झेडमधील पात्र गोकूच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये सेलिब्रेशन (Goku Style Celebration) केले आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू पियरे-एमरिक ऑबमेयांगही अशाच पद्धतीने सेलिब्रेशन करतो.
Chetan Skariya celebrated in Goku from Dragon ball Z style after dismissing Aaron Finch.
— SportzCraazy (@sportzcraazy) April 28, 2022
📸: Disney+Hotstar#RishabhPant #DelhiCapitals #ShreyasIyer #KKR #IPL2022 #Cricket #ChetanSakariya #Aubameyang #FCBarcelona #sportzcraazy #iplt20matches #followus pic.twitter.com/PDhAvgslUO
ऑबमेयांग हा प्रीमियर लीगमध्ये इंग्लिश कल्ब आर्सेनलसाठी खेळतो. तो गैबॉनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. त्याचे वडिल गैबोनीजदेखील फुटबॉलपटू होते. पण हे भावनिक सेलिब्रेशन सकारियाने त्याच्या या सेलिब्रेशनमागील कारणही स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, “हे भावनिक सेलिब्रेशन आहे. तसेच हे सेलिब्रेशन माझ्या वडिलांसाठी आहे. ते नेहमी मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या त्रिफळाचीत विकेट्सबद्दल बोलत असायचे.”
What a start🔥🔥🔥🔥 pic.twitter.com/nbnA7h7HAp
— abhishek sandikar (@ASandikar) April 28, 2022
चेतन हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती आहे चेतनचे वडील कानजीभाई साकारिया यांचे गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनामुळे निधन झाले होते. 14 व्या हंगामात चेतनला जेव्हा त्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने तात्काळ वडिलांच्या उपचारासाठी आपला पगार पाठवला. साकारिया यांने सांगितले होते की, तो त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती आहे. आणि आयपीएलमधून मिळालेल्या पैशांमुळेच त्यांच्या वडिलांचे उपचार शक्य झाले. चेतन याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून (RR) क्रिकेट खेळला होता. चेतनला राजस्थान संघाने 15 व्या मोसमात रिटेन केले नाही. त्यानंतर, मेगा लिलावात बोली लावताना दिल्ली कॅपिटल्सने चेतनला आपल्या संघात समाविष्ट केले. दिल्ली संघाने चेतनला 4.20 कोटी रुपयांना खरेदी केले. सकारियाने आतापर्यंत 15 आयपीएल मॅच खेळल्या आहेत. या 15 मॅचमध्ये 8.05 च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करताना 15 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 31 धावांवर 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.