जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मागच्या सिझनमध्ये हिरो, यंदा झिरो! 2 खेळाडूंच्या फ्लॉप शो मुळे KKR अडचणीत

IPL 2022 : मागच्या सिझनमध्ये हिरो, यंदा झिरो! 2 खेळाडूंच्या फ्लॉप शो मुळे KKR अडचणीत

IPL 2022 : मागच्या सिझनमध्ये हिरो, यंदा झिरो! 2 खेळाडूंच्या फ्लॉप शो मुळे KKR अडचणीत

आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Delhi Capitals vs Kolkata Knight Riders) 4 विकेट्सनं पराभव केला. केकेआरचा या सिझनमधील हा सलग पाचवा पराभव आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Delhi Capitals vs Kolkata Knight Riders) 4 विकेट्सनं पराभव केला. केकेआरचा या सिझनमधील हा सलग पाचवा पराभव आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कॅप्टनसीमध्ये खेळणारी ही टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. मागील सिझनमध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या केकेआरनं यंदा सर्वांनाच निराश केलं आहे. केकेआरला दोन प्रमुख खेळाडूंच्या सुमार कामगिरीचा मोठा फटका बसलाय. मागील सिझनमध्ये ओपनिंगला येत केकेआरला महत्त्वाचे विजय मिळवून देणााऱ्या व्यंकटेश अय्यरची  (Venkatesh Iyer) बॅट या सिझनमध्ये शांत आहे. अय्यर दिल्ली विरूद्ध 12 बॉलमध्ये फक्त 6 रन काढून आऊट झाला. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट अवघा 50 होता. त्यानं या सिझनमधील 9 मॅचमध्ये 17 च्या सरासरीनं फक्त 132 रन केले असून त्याचा स्ट्राईक रेट फक्त 98 आहे. जो टी20 क्रिकेटचा विचार करता अत्यंत कमी आहे. व्यंकटेश अय्यरनं मागील आयपीएल सिझनमध्ये पदार्पण केलं होतं. मध्य प्रदेशच्या या ऑल राऊंडरनं मागील सिझनमधील 10 मॅचमध्ये 41 च्या सरासरीनं 370 रन केले होते. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता. अय्यरचा या कामगिरीमुळे पुढे टीम इंडियात समावेश झाला. हार्दिक पांड्याचा वारसदार म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात होतं. केकेआरनंही त्याला रिटेन केले होते. शिक्षेनंतरही शहाणपण नाही, ऋषभ पंत पुन्हा एकदा केली ‘ती’ चूक! भर मैदानात… केकेआरनं रिटेन केलेला मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती  (Varun Chakravarthy) देखील या सिझनमध्ये फेल गेलाय, वरूणनं या सिझनमधील 8 मॅचमध्ये 8.82 च्या इकोनॉमी रेटनं फक्त 4 विकेट्स घेतल्या. या खराब कामगिरीमुळे त्याला दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध वगळण्यात आले होते. वरूणनं मागील आयपीएल सिझनमध्ये मिस्ट्री स्पिन बॉलिंगच्या जोरावर कमाल केली होती. त्यानं मागील सिझनमधील 17 मॅचमध्ये 6.58 च्या इकोनॉमी रेटनं 18 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची टी20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियातही निवड झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात