मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup यंदा कोण पटकवणार?, ब्रेट लीने वर्तवली भविष्यवाणी

T20 World Cup यंदा कोण पटकवणार?, ब्रेट लीने वर्तवली भविष्यवाणी

T20 World Cup यंदा कोण पटकवणार?, ब्रेट लीने वर्तवली भविष्यवाणी

T20 World Cup यंदा कोण पटकवणार?, ब्रेट लीने वर्तवली भविष्यवाणी

आगामी टी-20 वर्ल्ड कपला (ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, क्रिकेट जगतात यंदाच्या वर्ल्ड कपवर कुणाचे नाव कोरले जाणार याची चर्चा सुरु असतानाच आँस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने(brett lee) भविष्यावाणी वर्तवली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली,14 ऑक्टोबर : आगामी टी-20 वर्ल्ड कपला (ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, क्रिकेट जगतात यंदाच्या वर्ल्ड कपवर कुणाचे नाव कोरले जाणार याची चर्चा सुरु असतानाच आँस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने(brett lee) भविष्यावाणी वर्तवली आहे. त्याने एका वृत्त संस्थेशी बोलताना टी-20 वर्ल्ड कपचा यंदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ असल्याचे म्हटले आहे.

'फॉक्स स्पोटर्स डॉट कॉम डॉट एयू' या संस्थेशी ब्रेट लीने संवाद साधला. इंग्लंडचा संघ नेहमीच त्याच्या अनुभवाच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकण्याच्या मार्गावर असतो पण यंदा माझ्या दृष्टीने भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. यंदाच्या आयपीएलमुळे असे लक्षात आले की, भारताकडे चांगले युवा खेळाडू आहेत. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजही आहेत आणि भारताचा अव्वल क्रम उत्कृष्ट आहे . तसेच, भारतीय संघात सध्या फर्मात असलेला के एल राहुल टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'आधारस्तंभ' बनला पाहिजे ज्यामुळे कर्णधार विराट कोहलीवरील दबाव कमी होईल. असेही मत ब्रेट लीने यावेळी व्यक्त केले.

हे वाचा- IPL 2021; फायनलपूर्वी दिनेश कार्तिकला BCCI ने फटकारले, काय आहे कारण?

राहुल वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असू शकतो. “मला वाटते राहुल सर्वात जास्त धावा करेल. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली होती, भारताने राहुलला फलंदाजीचा मुख्य केंद्र बनवले पाहिजे कारण त्यामुळे कोहलीवरील दबाव कमी होईल. यामुळे कोहली आपला खेळ दाखवू शकेल. कदाचित कर्णधार म्हणून कोहलीची ही शेवटची स्पर्धा असेल, त्यामुळे त्याला नक्कीच चांगली कामगिरी करण्याची इच्छा असेल. असे मत ब्रेट लीने यावेळी व्यक्त केले.

तसेच, मला वाटतं सूर्यकुमार यादव आगामी स्टार असेल. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम संघ निवडला आहे आणि ते भारतासाठी एक आव्हान असू शकतात असेही ली म्हणाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया 20 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये सराव सामना खेळतील.

हे वाचा- KKR ला पुढील सिझनमध्ये मिळणार नवा कॅप्टन, मॉर्गनची होणार हकालपट्टी!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, भारतात ऑक्सिजनची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यावेळी, भारताच्या मदतीसाठी ब्रेट ली पुढे सरसावला होता. त्यावेळी ब्रेट लीने मदत जाहीर करताना भारत हे माझं दुसर घर असल्याची भावना व्यक्त केली होती.

First published:

Tags: Kl rahul, T20 cricket, T20 world cup, Team india, Virat kohli