मुंबई, 11 एप्रिल: आयपीएल 2022 (IPL 2022)मध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर (lsg vs rr) यांच्यात 20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊवर रोमांचक विजय मिळवला आहे. या सामन्यादरम्यान, राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने(Yuzvendra Chahal ) सामन्यात स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि सामनावीर देखील ठरला. यासोबत चहल आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात जलद 150 विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने लखनऊविरुद्धच्या या सामन्यात 4 षटके गोलंदाजी केली. यामध्ये चहलने 40 धावा दिल्या आणि 4 विकेट्स नावावर केल्या. यादरम्यान चहलने आयपीएल कारकीर्दीतील वैयक्तिक 150 विकेट्स पूर्ण केल्या, ते देखील अवघ्या 118 सामन्यांमध्ये. Explained : IPL मध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आलेला Retired Out नियम काय आहे? आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान 150 विकेट्सचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी श्रीलंकन दिग्गज लसिथ मलिंगा याने केली आहे. मलिंगाने अवघ्या 105 आयपीएल सामन्यांमध्ये वैयक्तिक 150 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 118 सामन्यांसह या यादीत युजवेंद्र चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर ड्वेन ब्रावो आहे, ज्याने 137आयपीएल सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आमित मिश्रा आहे, ज्याने 140 सामन्यात 150 आयपीएल विकेट्स घेतल्या आहेत. चहलने या सामन्यात, लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉक, महत्वाचा फलंदाज आयुष बदोनी, अष्टपैलू कृणाल पंड्या आणि गोलंदाज दुष्मंथा चमीरा यांच्या विकेट्स घेतल्या. राजस्थानने दिलेल्या 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 ओव्हरमध्ये 162/8 पर्यंतच मजल मारता आली. लखनऊला शेवटच्या ओव्हरमध्येविजयासाठी 16 रनची गरज होती, पण कुलदीप सेनने (Kuldeep Sen) टाकलेल्या भन्नाट ओव्हरमुळे लखनऊला विजय मिळवता आला नाही. मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) 17 बॉलमध्ये 38 रनवर नाबाद राहिला, त्याने 2 फोर आणि 4 सिक्स मारले. याशिवाय क्विंटन डिकॉकने 39, कृणाल पांड्याने 22 आणि दीपक हुड्डाने 25 रनची खेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







