मुंबई, 11 एप्रिल : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) हा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील रिटायर्ड आऊट (Retired Out) झालेला पहिला खेळाडू बनला आहे. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध रविवारी झालेल्या मॅचमध्ये अश्विन बॅटींग करत असताना अचानक क्रिझ सोडून पॅव्हिलियनमध्ये निघून गेला. अश्विन या मॅचमध्ये राजस्थानच्या इनिंगमधील दहाव्या ओव्हरमध्ये आणि सहाव्या क्रमांकावर बॅटींगसाठी आला होता.
राजस्थानच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरचे दोन बॉल झाल्यानंतर अश्विननं रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय केला. त्याने 23 बॉलमध्ये 28 रन केले. अश्विननं रिटायर्ड आऊट होत रियान परागला संधी दिली. परागनं 4 बॉलमध्ये 8 रन केले. राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 165 रन केले.
रिटायर्ड आऊट म्हणजे काय?
कोणताही बॅटर अंपायर किंवा विरोधी टीमच्या कॅप्टनच्या सहमती शिवाय इनिंग सुरू असतानाच मैदान सोडून पॅव्हिलियनमध्ये निघून गेल्यास तो रिटायर्ड आऊट झाला असे समजतात. नियमानुसार ती विकेट पकडली जाते. एकदा रिटायर्ड आऊट झालेला बॅटर त्या इनिंगमध्ये पुन्हा बॅटींगसाठी येऊ शकत नाही. दुसरीकडं रिटार्ड हर्ट झालेला बॅटर टीमला गरज असेल तर पुन्हा बॅटींगसाठी मैदानात येऊ शकतो.
IPL 2022 : सलून चालकाचा मुलगा पहिल्याच सामन्यात ठरला सुपरस्टार, बलाढ्य स्टॉयनिसनेही टेकले गुडघे
हेटमायर म्हणाला 'नो आयडिया'
अश्विननं रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्यासोबत हेटमायर खेळत होता. इनिंग ब्रेकच्या दरम्यान त्याला या प्रकरणात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आपल्यायाल याबाबत कोणतीही आयडिया नव्हती, असं त्यानं सांगितलं. 'अश्विन अचानक क्रिझ सोडून पॅव्हेलियनमध्ये का निघून गेला हे आपल्याला माहिती नाही', असे हेटमायर यावेशी म्हणाला.
राजस्थानने रविवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा 3 रननं निसटता पराभव केला. 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 162 पर्यंत मजल मारली.
लखनऊविरुद्धच्या या विजयामुळे राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने या मोसमात 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे लखनऊची टीम क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, लखनऊने 5 पैकी 3 विजय मिळवले आणि 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, R ashwin, Rajasthan Royals