मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विनेश फोगाटवर बंदी! Tokyo Olympic 2020 दरम्यान या तीन नियमांचं केलं उल्लंघन

विनेश फोगाटवर बंदी! Tokyo Olympic 2020 दरम्यान या तीन नियमांचं केलं उल्लंघन

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) ऑलिम्पिक स्पर्धा महागात पडली आहे. विनेशवर तात्पुरती बंदी (temporary ban on Vinesh Phogat) आणण्यात आली आहे.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) ऑलिम्पिक स्पर्धा महागात पडली आहे. विनेशवर तात्पुरती बंदी (temporary ban on Vinesh Phogat) आणण्यात आली आहे.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) ऑलिम्पिक स्पर्धा महागात पडली आहे. विनेशवर तात्पुरती बंदी (temporary ban on Vinesh Phogat) आणण्यात आली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: गेले काही दिवस क्रिडा रसिकांसाठी पर्वणीचे दिवस होते. भारताने ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) चांगलं प्रदर्शन केलं आहे. दरम्यान भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) ऑलिम्पिक स्पर्धा महागात पडली आहे. विनेशवर तात्पुरती बंदी (temporary ban on Vinesh Phogat) आणण्यात आली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (Wrestling Federation of India WFI) ही बंदी आणली आहे. 53 किलोग्रॅम वजनी गटातील या भारताच्या स्टार कुस्तीपटूवर तीन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दरम्यान फेडरेशनने तिला तिची बाजू मांडण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी दिला आहे.

वृत्तसंस्था पीटीआयला रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनेशला कोणतीही राष्ट्रीय किंवा देशांतर्गत स्पर्धा खेळता येणार नाही आहे, जोपर्यंत ती याबाबत तिची बाजू मांडत नाही. शिवाय अंतिम निर्णय हा WFI चा असणार आहे.

हे वाचा-IND vs ENG : नॉटिंघममध्ये पावसामुळे निराशा, लॉर्ड्सवर 5 दिवस असं असणार हवामान

विनेशवर आहेत हे तीन आरोप

विनेशवर मुख्यत्त्वे हे तीन आरोप करण्यात आले आहेत की, एक म्हणजे तिने टोक्यो ऑलिम्पिक दरम्यान भारतीय टीमसह राहण्यास नकार दिला. दुसरा आरोप असा आहे की भारतीय टीमच्या कोचकडून प्रशिक्षण घेण्यास नकार दिला तर तिसरा आरोप असा आहे की, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडून मंजुर करण्यात आलेले सिंगलेट (खेळाडूंकडून स्पर्धेदरम्यान परिधान करण्यात येणारे कपडे) तिने परिधान केले नव्हते. तिने त्याऐवजी तिचे प्रायोजक नायकीचे सिंगलेट परिधान केले. द इंडियन एक्स्प्रेसने WFI चे प्रेसिडेंट ब्रिज भुषण सिंह यांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी अशीही माहिती दिली की असा प्रकार पहिल्यांदा घडला नाही आहे. पण यापूर्वी खेळाडूची प्रतिष्ठा लक्षात घेता दूर्लक्ष करण्यात आले होते.

हे वाचा-Olympic चा रोमांच आणखी वाढणार, क्रिकेटच्या समावेशासाठी ICC ची बॅटिंग!

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशला सुवर्णपदकाची दावेदार मानण्यात येत होतं, मात्र तिचा बेलारुसच्या व्हेनेसाकडून पराभव झाला. टोक्योमध्ये पोहोचण्यापूर्वी विनेश तिचे कोच वोलर अकोससह हंगेरीमध्ये होती. पंधरा दिवसांच्या ट्रेनिंगनंतर ती थेट टोक्योमध्ये पोहोचली, यावेळी तिने भारतीय टीमसह ट्रेनिंग घेण्यास किंवा राहण्यास नकार दिल्याची माहिती मिळते आहे.

First published:

Tags: Olympics 2021