लंडन, 10 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यातली दुसरी टेस्ट मॅच लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर होणार आहे. पाच टेस्ट मॅचच्या सीरिजची दुसरी टेस्ट 12 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट पाऊस आणि खराब हवामानामुळे ड्रॉ झाली. मॅचच्या अखेरच्या दिवशी पावसामुळे एकही बॉल फेकला गेला नाही. यानंतर आता दुसऱ्या टेस्टसाठी लंडनमधलं हवामान (London Weather Report) कसं असेल, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
नॉटिंघममधून लंडनला पोहोचायला जवळपास 3 तास लागतात. दोन्ही ठिकाणी हवामान वेगळं असतं. दुसरी टेस्ट 12 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. Accuweather नुसार पहिल्या दिवशी तापमान 23 डिग्री सेल्सियस असेल, तसंच पावसाची शक्यता कमी आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 13 ऑगस्टलाही तापमान पहिल्या दिवासारखंच असेल, पण दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. ढग असले तरी पावसाची शक्यता कमी आहे. 14 ऑगस्ट म्हणजे मॅचच्या तिसऱ्या दिवशी थोडी जास्त गरमी असेल, तर रविवारी 15 ऑगस्टला मोसम चांगला राहिल. 16 ऑगस्टलाही पावसाचा अंदाज नसल्याचं हवामान खात्याने सांगतिलं आहे.
Hello 👋 Lord's, we're here #TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/JjaFL82Qnq
— BCCI (@BCCI) August 10, 2021
— BCCI (@BCCI) August 10, 2021
हवामान खात्याचा हा अंदाज बरोबर आला तर दुसऱ्या टेस्टमध्ये पावसामुळे खेळावर परिणाम होणार नाही. भारतीय टीम सोमवारी लंडनला रवाना झाली. पण सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ नॉटिंघममध्येच आपलं क्वारंटाईन पूर्ण करत आहेत. दुसऱ्या टेस्टसाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, London