ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी करत एक विक्रम नावावर केला. स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली. वेस्ट इंडिज विरोधात स्टीव्ह स्मिथने शतक केलं, त्याचं हे कसोटी कारकिर्दीतलं 29वे शतक ठरले. एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील त्याचं हे 41 वे शतक होते. तसंच त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 41 शतके झळकावली आहेत. आता स्टीव्ह स्मिथने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावत रोहित शर्माच्या कामगिरीशी बरोबरी केलीय. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात स्मिथने शतक केल्यास तो रोहित शर्माला मागे टाकू शकतो. हेही वाचा : बांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित? कर्णधारही बदलणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत आता रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ हे संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर आहेत. सध्या खेळत असलेल्यांमध्ये विराट कोहली 71 शतकांसह पहिल्या स्थानी आहे. तर जो रूट आणि डेव्हिड वॉर्नर 44 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहेत. स्टीव्ह स्मिथपेक्षा कसोटीमध्ये तीनच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सर्वाधिक शतके झळकावली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग 41 शतकांसह पहिल्या जागी आहे. तर स्टीव्ह वॉच्या नावावर 32 शतके, मॅथ्यू हेडनच्या नावावर ३० शतके आहेत. हेही वाचा : इंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई सर्वात कमी डावांमध्ये 29 कसोटी शतके झळकावण्याच्या यादीत स्मिथ तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने 148 डावात 29 वे शतक केले होते. तर डॉन ब्रॅडमन यांनी केवळ 79 डावात 29 शतके केली होती. वेस्ट इंडिजविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथने 180 चेंडूत शतक केलं. तर पुढे खेळताना 311 चेंडूत नाबाद 200 धावा केल्या. या खेळीत त्यानं 16 चौकार लगावले. तसंच मार्नस लाबुशेननेसुद्धा 204 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला डाव 4 बाद 598 धावांवर घोषित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.