मुंबई, 11 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जाएंट्सवर (Rajsthan Royals vs Lucknow Super Giants) 3 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलवर केएल राहुल (KL Rahul) आणि कृष्णप्पा गौतम शून्य रनवर आऊट झाले. आणि राहुलची कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने (Athiya Shetty) दिलेली रिअॅक्शन ही पाहण्यासारखी होती. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची मुलगी अथिया शेट्टी दोघांनीही हजेरी लावली होती. पहिल्याच चेंडूवर केएल राहुल बाद झाला तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळाली. सध्या त्या दोघांचेही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
हे वाचा - IPL 2022, SRH vs GT Dream 11 Team Prediction: ‘या’ 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य
केएल राहुलने राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध या मोसमातील आपला दुसरा गोल्डन डक झळकावला. डावाच्या पहिल्या चेंडूवर राहुलला किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने क्लीन बोल्ड केले. याआधी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर राहुलला पायचीत केले होते.
💔
— Juman Sarma (@cool_rahulfan) April 10, 2022
@klrahul11 • @theathiyashetty pic.twitter.com/SEB5104keG
केएल राहुलसोबत अथिया शेट्टीचे नाव अनेकदा चर्चेत येते. दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. राजस्थानने दिलेल्या 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 ओव्हरमध्ये 162/8 पर्यंतच मजल मारता आली.