मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मिस्ट्री बॉय Aryan Khan सोबत झळकलेली 'ती' Mystery Girl आहे तरी कोण?

मिस्ट्री बॉय Aryan Khan सोबत झळकलेली 'ती' Mystery Girl आहे तरी कोण?

Aryan Khan

Aryan Khan

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो. आर्यन खान नुकताच इंडियन प्रीमियर लीगची 2022 (Indian Premier League 2022) पहिला सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमध्ये पोहोचला. त्याची चर्चा क्रिकेट जगतात सुरु असतानाच आता त्याच्यासोबत दिसलेल्या तरुणीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 28 मार्च: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो. आर्यन खान नुकताच इंडियन प्रीमियर लीगची 2022 (Indian Premier League 2022) पहिला सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमध्ये पोहोचला. त्याची चर्चा क्रिकेट जगतात सुरु असतानाच आता त्याच्यासोबत दिसलेल्या तरुणीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आर्यनसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण आहे असा सवाल सध्या क्रिकेट वर्तुळात उपस्थित होत आहे.

IPL 2022 चा पहिला सामना शाहरूख खान - जूही चावलाची टीम कोलकाता नाईट राईडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होता. सध्या शाहरूख खान त्याच्या पठाण सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आर्यन थेट वानखेडे मैदानात पोहचला. त्याचे फोटो व्हायरल होत आहे. अशातच त्याच्यासोबत सुंदर दिसणारी तरुणीदेखील व्हायरल होत आहे.

कोण आहे मिस्ट्री गर्ल?

आर्यन खानसोबत जुही चावलाची मुलगीही मॅचदरम्यान स्टँडमध्ये दिसली होती. ही मिस्ट्री गर्ल जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताची मैत्रिण असून तिच्यापासून थोड्या अंतरावर आर्यन खानच्या शेजारी बसली होती. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आर्यन खान काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे, तर या मिस्ट्री गर्लने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप घातला आहे आणि पोनीटेलमध्ये सुंदर दिसत आहे.

'IPL 2022'ध्ये झळकला 'KKR' चा मिस्ट्री बॉय, त्याच्या Smile ने केली सर्वांवर जादू...

Mystery Girl

Mystery Girl

यापूर्वी सोशल मीडियावर स्टॅंडमध्ये उभा असलेल्या आर्यन खानची स्माईलची सगळीकडे चर्चा रंगलेली होती. त्याच्या स्माईला फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या आयपीएलच्या (IPL) आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Kight Riders) 6 विकेटने दणदणीत विजय मिळवून स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

First published:

Tags: Aryan khan, Csk, Ipl 2022, KKR