मुंबई, 27 मार्च- शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) इंनेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो. आर्यन खान नुकताच इंडियन प्रीमियर लीगची 2022 (Indian Premier League 2022) पहिला सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमध्ये पोहोचला. IPL 2022 चा पहिला सामना शाहरूख खान - जूही चावलाची टीम कोलकाता नाईट राईडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होता. सध्या शाहरूख खान त्याच्या पठाण सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सामान्याला उपस्थिती लावत आर्यन खानने शाहरूखची जागा भरून काढली. आर्यन खान यावेळी आपल्या टीमला प्रोत्साहन देताना दिसला. यानंतर काही क्षणात सोशल मीडियावर आर्यन खानचेच फोटो व्हायरल झाले. विशेषकरून त्याचा स्माईल करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
यावेली आर्यन खान काळ्या रंगाच्या नेक टी-शर्टमध्ये दिसला. यावेळी आर्यनसोबत केकेआरचे समर्थक दिसले. यावेळी त्याची बहीण सुहाना खान(Suhana Khan) मैदानात दिसली नाही. नेटकऱ्यांना मात्र यावेळी आर्यन खानमध्ये शाहरूखची छाप दिसली. ज्यूनिअर खानला स्टेडियममधून पाहून चाहत्यांना मात्र आनंद झाला होता.
वाचा-प्रियाने दिला किलर लूक पण चाहत्यांना आवरेना हसू; केल्या मजेशीर कमेंट कारण..
यावेळी स्टॅंडमध्ये उभा असलेल्या आर्यन खानची स्माईलची सगळीकडे चर्चा रंगलेली होती. त्याचा हाच फोटो सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. एक नेटकऱ्याने आर्यन खानची स्माईल पाहून म्हटलं आहे की, पहिल्यांदा या मुलाला हासताना पाहिले आहे. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, शेवटी मी या मुलाला हासताना पाहिलं..खूपचा डाऊन टू अर्थ....अशा अनेक कमेंट येत आहेत.
यापूर्वी आर्यन खान आई गौरी खानसोबत धर्मा प्रोडक्शन्सच्या ऑफीसमध्ये सीईओ अपूर्वा मेहताच्या बर्थडेच्या पार्टीत दिसला होता. अपूर्व मेहताला काही दिवसापूर्वी करण जोहरने धर्मा प्रोडक्सनच्या सीईओ पदाची जबाबदारी दिली. ड्रग्स केसनंतर आर्यन खान पहिल्यांदाच असा एकाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये दिसला होता. व्हाईट सूटमध्ये आर्यन खूपच हॅण्डसम दिसत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Shah Rukh Khan