मुंबई, 30 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षातला सर्वात मोठा क्रिकेटींग इव्हेंट पार पडणार आहे. सर्वांनाच आगामी टी20 वर्ल्ड कपची उत्सुकता आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या महासंग्रामात तब्बल 16 टीम्स मैदानात उतरणार आहे. त्यासाठी या 16ही संघांनी आपापले 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहे. येत्या आठवड्यात हे संघ ऑस्ट्रेलियात दाखल व्हायला सुरुवात होणार आहे. पण एक संघ चक्क स्पर्धेच्या सोळा दिवस आधीच ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियात दाखल अफगाणिस्तानचा संघ नुकताच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. महत्वाचं म्हणजे अफगाणिस्तान सुपर-12 फेरीसाठी थेट पात्र ठरला आहे. त्यामुळे 22 ऑक्टोबरनंतर अफगाणिस्तानच्या सामन्यांना सुरुवात होईल. त्यामुळे इतक्या लवकर अफगाणिस्तानची टीम ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Touch Down Australia 🇦🇺 📍
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 30, 2022
AfghanAtalan have checked in Australia this afternoon to feature in the ICC Men's @T20WorldCup 2022. #AfghanAtalan | #T20WorldCup2022 pic.twitter.com/ovuTCp5X4P
22 सप्टेंबरला सोडला देश दरम्यान अफगाणिस्तान संघानं वर्ल्ड कपच्या तयारीसाठी 22 सप्टेंबरलाच राजधानी काबूलमधून यूएईला प्रयाण केलं. दुबईत अफगाणिस्तानचं वर्ल्ड कपआधी ट्रेनिंग पार पडलं. 4 दिवसांच्या या ट्रेनिंग सेशननंतर मोहम्मद नबीच्या नेतृत्वात टीम अफगाणिस्तान कांगारुंच्या देशात दाखल झाली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याचे फोटो शेअर केले आहेत.
UAE, here we come! ✈️ 👍
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 22, 2022
AfghanAtalan have left Kabul for UAE to feature in a training & preparation camp in UAE, followed by another conditioning camp in Australia for the ICC Men's @T20WorldCup 2022. #AfghanAtalan | #T20WorldCup2022 pic.twitter.com/YXSHECp14V
सुपर-12 साठी थेट पात्र 16 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-12 साठीच्या क्वालिफायर सामन्यांना सुरुवात होणार आहे. पण अफगाणिस्ताननं आधीच सुपर-12 मध्ये धडक मारली आहे. स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी आयसीसी टी20 रँकिंगमधल्या अव्वल 8 संघांना थेट सुपर-12 मध्ये प्रवेश मिळाला. त्यात अफगाणिस्तानचाही समावेश होता. अन्य आठपैकी 4 संघ सुपर -12 फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यासाठी नामिबिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज, स्कॉटलँड, आयर्लंड, झिम्बाब्वे, यूएई, नेदरलँड हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. 16 ऑक्टोबपासून क्वालिफायर राऊंड सुरु होणार. तर 22 ऑक्टोबरपासून सुपर-12 फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. हेही वाचा - Jaspreet Bumrah: वर्षभरात केवळ 5 टी20, वर्ल्ड कपमधूनही ‘आऊट’, पाहा बुमराचं स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे नक्की काय?
वर्ल्ड कपसाठीचा अफगाणिस्तान संघ
मोहम्मद नबी (कर्णधार), रहिमतुल्लाह गुरबाज (विकेट किपर), हजरतउल्ला झाजाई, दार्विश रसूल, इब्राहिम झादरान, नजीबउल्लाह झादरान, काईस अहमद, उस्मान गनी, मुजीब उर रेहमान, सलीम सकी, अजमतउल्लाह ओमरजाई, फैझल फारुकी, नवीन उल हक, फारीद मलिक, रशिद खान