मुंबई, 30 सप्टेंबर: जसप्रीत बुमरा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्वाचा शिलेदार मानला जातो. गेल्या काही वर्षात बुमराचं भारतीय क्रिकेटमधलं योगदान फार मोठं आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये बुमरा खेळणार नाही हे कळल्यावर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराला याआधी आशिया कप स्पर्धेलाही मुकावं लागलं होतं. त्यानंतर आशिया कपमध्ये भारताचं आव्हान सुपर 4 मध्येच संपुष्टात आलं. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये बुमरावर टीम इंडियाची मोठी मदार होती. बुमराला नक्की काय झालंय? दुखापतीमुळे बुमरा पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाही. कारण स्ट्रेस फ्रॅक्चर. आता हे स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे नेमकं काय? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जास्त धावल्यानं किंवा शारिरिक काम केल्यानं ही समस्या उद्भवते. जेव्हा तुम्ही शरीरावर जास्त दबाव टाकता तेव्हा तुम्हीही याचे शिकार होऊ शकता. आता या स्ट्रेस फ्रॅक्चरचं कारण, कुणाला ही दुखापत होऊ शकते आणि त्यापासून कसं वाचता येऊ शकतं ते पाहा. हेही वाचा - T20 word Cup: तुम्हाला माहित आहे टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला किती बक्षिस मिळतं? ICC नं जाहीर केली माहिती काय आहे स्ट्रेस फ्रॅक्चर? एका रिपोर्टनुसार स्ट्रेस फ्रॅक्चर ही खेळाडूंना होणारी एक सामान्य इन्ज्युरी आहे. खेळताना किंवा सराव करताना अनेक वेळा हाडांमध्ये फ्रॅक्चर होतं. पण ही दुखापत खूप वेदनादायी आणि बरी होण्यास अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. इतकच नाही तर दुखापतीचं स्वरुप मोठं असेल तर सर्जरीही करावी लागू शकते. बुमराच्या बाबतीत अजूनही सर्जरीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. स्ट्रेस फ्रॅक्चरची लक्षणं स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे धावणं, चालणं आणि व्यायाम करताना शरीराच्या त्या भागात तीव्र वेदना जाणवते. इतकच नाही तर काही वेळ उभं राहिल्यानंतरही वेदना सुरू होतात. कधीकधी जिथे फ्रॅक्चर आहे तिथे सूज येते. जे लोक व्यायामादरम्यान सावधगिरी बाळगत नाहीत आणि जास्त वर्कआउट करतात त्यांना याचा धोका जास्त असतो. एक्सरेमध्ये शक्यतो ही दुखापत दिसून येत नाही. त्यामुळे एमआरआय किंवा न्यूक्लियर बोन स्कॅन केलं जातं. हेही वाचा - Women Asia Cup: पुन्हा आशिया कप, पुन्हा महामुकाबला… वर्ल्ड कपआधी बांगलादेशात भारत-पाक लढत स्ट्रेस फ्रॅक्चरवर ट्रीटमेंट स्ट्रेस फ्रॅक्चरचे उपचार दुखापतीनुसार करण्यात येतात. यामधून बाहेर पडण्यासाठी उपचारासोबतच दीर्घ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर वेदना कमी करण्यासाठी औषधं देतात. गरज पडली तर सर्जरीही केली जाते. यातून बरे होण्यासाठी कमीत कमी 6-8 आठवड्यांचा कालावधी लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.