• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार!

...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार!

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) खेळणार का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) खेळणार का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टीमना त्यांचे राष्ट्रीय ध्वज आयसीसीला द्यावे लागणार आहेत. यामध्ये जर तालिबानचा झेंडा (Taliban Flag) देण्यात आला, तर मात्र अफगाणिस्तानची टी-20 वर्ल्ड कपमधून गच्छंती व्हायची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये तालिबानने (Taliban Captures Afghanistan) कब्जा केला. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर लगेचच तालिबानने अफगाणिस्तानच्या महिला टीमला खेळण्यावर बंदी घातली, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर महिन्यात होणारी टेस्ट खेळायला नकार दिला. महिला टीमवर बंदी घातल्यामुळे अफगाणिस्तानच्या टेस्ट टीमचा दर्जाही धोक्यात आला आहे. आयसीसीच्या (ICC) नियमानुसार टेस्ट दर्जा मिळवण्यासाठी देशाच्या महिला आणि पुरुष टीम असणं गरजेचं आहे. अजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द होण्याबद्दल लावलं महाराष्ट्र कनेक्शन! काहीच दिवसांपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ हमीद शिनवारी यांची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या जागी नसीब झादरान खान यांची नियुक्ती केली गेली. या नियुक्तीमागे तालिबानचा हात असल्याचं बोललं गेलं. अफगाणिस्तान वर्ल्ड कपमध्ये कोणत्या झेंड्याखाली खेळणार हे अजून समजू शकलं नाही, पण आयसीसी या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. तसंच या प्रकरणी तातडीची बैठक घेण्याची तयारीही आयसीसीने दाखवली आहे. तालिबानचा झेंडा घेऊन खेळण्याचा निर्णय जर अफगाणिस्तानने घेतला तर आयसीसीचे इतर सदस्य देश यावर आक्षेप घेऊ शकतात. सर्वाधिक सदस्यांनी तालिबानच्या झेंड्याला विरोध केला तर अफगाणिस्तानला टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. अफगाणिस्तान 25 ऑक्टोबरला शारजाहमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप-8 टीममध्ये असल्यामुळे अफगाणिस्तानची टीम थेट टी-20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली. T20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा! अफगाणिस्तानची टीम जर टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकली नाही, तर त्यांच्याऐवजी कोणत्या टीमचा समावेश केला जाईल? याबाबत अजून आयसीसीने दुसरी कोणतीही रणनिती आखली नाही. नोव्हेंबर महिन्यात आयसीसीची बैठक होणार आहे, या बैठकीत अफगाणिस्तानच्या टेस्ट दर्जाचं भवितव्यदेखील ठरणार आहे. महिला टीम खेळत नसल्यामुळे अफगाणिस्तानचा टेस्ट दर्जा जाण्याचीही शक्यता आहे. अफगाणिस्तान सध्या आयसीसीच्या 12 पूर्ण सदस्यांपैकी एक आहे. अफगाणिस्तानचा टेस्ट दर्जा घालवण्यासाठी आयसीसीच्या 17 पैकी 12 जणांनी त्यांच्याविरोधात मत देणं गरजेचं आहे. T20 World Cup : सगळ्यात मोठा सामना भारताविरुद्ध नाही, तर... शोएब अख्तरची या टीमला 'धमकी'
  Published by:Shreyas
  First published: