मराठी बातम्या /बातम्या /स्पेशल स्टोरी /सेलिब्रिटींमध्ये कॅन्सर का वाढतोय?

सेलिब्रिटींमध्ये कॅन्सर का वाढतोय?

 दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मनीषा कोरईराला, युवराज सिंग, लिजा रे, अनुराग बसू, बार्बरा मोरी या सेलिब्रिटिंनी कॅन्सरसोबतची लढाई जिंकली आणि ते पुन्हा मैदानात उतरलेत.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मनीषा कोरईराला, युवराज सिंग, लिजा रे, अनुराग बसू, बार्बरा मोरी या सेलिब्रिटिंनी कॅन्सरसोबतची लढाई जिंकली आणि ते पुन्हा मैदानात उतरलेत.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मनीषा कोरईराला, युवराज सिंग, लिजा रे, अनुराग बसू, बार्बरा मोरी या सेलिब्रिटिंनी कॅन्सरसोबतची लढाई जिंकली आणि ते पुन्हा मैदानात उतरलेत.

    मुंबई, 06 जुलै : सोनाली बेंद्रेनं फेसबुक पोस्ट टाकली आणि तिचे चाहते चिंतेत पडले. कारण तिला हायग्रेड कॅन्सर झाल्याचं तिनं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलं. कॅन्सरच्या विळख्यात अडकणारी सोनाली ही पहिली सेलिब्रिटी नाही. याआधी इरफानसह अनेक बॉलिवूडचे स्टार कॅन्सरच्या विळख्यात अडकलेत.

    काहींनी जिद्दीच्या जोरावर संकटावर मात केली तर काहींना कॅन्सरसमोर हार पत्करावी लागली. कॅन्सर नेमका का बळावतो.?

    अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं सोशल साईटवर टाकलेल्या भावनिक पत्रानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सरशी झुंज देतोय. त्यातच सोनालीची ही बातमी बॉलिवूडला आणखी एक धक्का देणारी आहे. त्यातून काही प्रश्न निर्माण झालेत.

    हेही वाचा

    लवकरच येणार 'महेंद्र सिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चा सिक्वल!

    राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेत प्रेम राधापर्यंत पोहचू शकेल का?

    सुबोध भावेच्या 'पुष्पक विमान'चा टीझर तुम्ही पाहिलात का?

    सोनाली बेंद्रेनं लिहिलं, कधीकधी, अगदी अनपेक्षितरित्या, तुमचं आयुष्य एक वळण घेतं. मला नुकतंच हायग्रेड कॅन्सरचं निदान झालं आहे. जो सातत्यानं पसरत चालला आहे. असं निदान होणं हे आमच्यासाठी अनाकलनीय होतं. माझं कुटुंब आणि मित्रपरिवार सातत्यानं माझ्यासोबत होता आणि त्यांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. असे जीवलग लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे. मी त्या प्रत्येकाची आभारी आहे. त्वरित उपचार करणं याशिवाय याच्याविरोधात लढण्याचा आणखी चांगला पर्याय नाही.त्यामुळेच, माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आम्ही खूप आशावादी आहोत आणि प्रत्येक टप्प्यावर या आजाराशी लढण्याचा आम्ही निर्धार केला आहे.

    सेलिब्रिटिंमध्ये कॅन्सर का वाढतोय? व्यसन आणि जीवनशैली जबाबदार आहे का? अनुवंशिकता याला जबाबदार आहे का?

    कॅन्सर माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्या कमजोर करतो. 80च्या दशकात नर्गिस, काही वर्षांपूर्वी राजेश खन्ना, विनोद खन्ना,  आदेश श्रीवास्तव यांना कॅन्सरनं गाठलं. त्यांची झुंज अपयशी ठरली.

    कॅन्सरशी लढाई सोपी नसते. कॅन्सरशी लढताना उपचारांइतकंच मानसिकदृष्याही कणखर असणं गरजेचं असतं. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मनीषा कोरईराला, युवराज सिंग, लिजा रे, अनुराग बसू, बार्बरा मोरी या सेलिब्रिटिंनी कॅन्सरसोबतची लढाई जिंकली आणि ते पुन्हा मैदानात उतरलेत.

    सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच कॅन्सर गाठतोय. त्याचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. कॅन्सर म्हणजे झाडामागे लपलेला साप असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण कायम सजग राहाणं खूप गरजेचं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Cancer, Celebrities, Films, Irfaan khan, Sonali bendre