सुबोध भावेच्या 'पुष्पक विमान'चा टीझर तुम्ही पाहिलात का?

सुबोध भावेच्या 'पुष्पक विमान'चा टीझर तुम्ही पाहिलात का?

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभंगगीतांचे नवे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. 3 ऑगस्टला पुष्पक विमान प्रदर्शित होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 05 जुलै : बहुचर्चित सिनेमा 'पुष्पक विमान'चा टीझर रिलीज झाला. अभिनेता,निर्माता आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या पार पाडल्यात सुबोध भावेने 'पुष्पक विमान' या सिनेमात. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा सिनेमा आजोबा आणि नातवाची गोष्ट आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभंगगीतांचे नवे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. 3 ऑगस्टला पुष्पक विमान प्रदर्शित होणार आहे.

सिनेमात आजोबांच्या भूमिकेत अभिनेते मोहन जोशी आहेत. तर सुबोध भावे नातवाच्या भूमिकेत आहे. आजोबा पहिल्यांदाच शहरात येतात आणि इथलं जग पाहून थक्क होतात. त्यांनी विमानही पहिल्यांदाच पाहिलं असतं. आणि त्या विमानात त्यांना बसायचं असतं. त्यासाठी त्यांच्या नातवाचा आटापिटा सुरू होतो.

First published: July 5, 2018, 2:26 PM IST

ताज्या बातम्या