'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेत प्रेम राधापर्यंत पोहचू शकेल का?

'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेत प्रेम राधापर्यंत पोहचू शकेल का?

राधाच्या एका निर्णयाने सगळ्याच गोष्टी बदलून जातात. राधा प्रेमच्याच काय तर सगळ्यांच्याच आयुष्यातून निघून जाते.

  • Share this:

मुंबई, 05 जुलै: राधा आणि प्रेम यांच्या प्रेमाची सुरुवातच मुळी वेगळ्याप्रकारे झाली. राधा आणि प्रेम एकमेकांच्या प्रेमामध्ये कसे गुंतत गेले... प्रेमाची भावना एकमेकांच्या मनामध्ये आली हे त्यांचे त्यांनादेखील कळाले नाही. देशमुख आणि निंबाळकर कुटुंब या दोघांच्या प्रेमाची साक्ष होते. सगळंक काही सुरळीत सुरु आहे असं वाटत असतानाच नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. राधाच्या एका निर्णयाने सगळ्याच गोष्टी बदलून जातात. राधा प्रेमच्याच काय तर सगळ्यांच्याच आयुष्यातून निघून जाते.

देवयानी आणि दीपिकाच्या या खेळीत राधा- प्रेम मात्र अपयशी ठरले. प्रेमचं दीपिकाशी लग्न व्हावं म्हणून देवयानी जाणूनबुजून प्रेमच्या मनात राधाबद्दल गैरसमज निर्माण करते. या सगळ्याशी अनभिज्ञ राधा प्रेमा या नावाने इंदौरला आनंद नाडकर्णी यांच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत असते. आधी याबद्दल कोणालाच माहित नसतं. परंतु आता हा गुंता हळूहळू सुटू लागला आहे.

विश्वनाथ यांनी म्हणजेच प्रेमच्या सावत्र वडिलांनी प्रेमला देवयानीची सगळी कारस्थानं सांगितली. येत्या काळात प्रेमला राधा सुखरूप असल्याचे कळणार आहे. पण अजूनही त्याला तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. दुसरीकडे परिस्थीतीमुळे प्रेमला दीपिकाशी लग्न करावं लागणार आहे. पण तो हे लग्न करणार का की यामध्येही प्रेमच्या मनात काही वेगळं आहे. तसेच प्रेम राधाला कसं शोधणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली रात्री 9.00 वाजता कलर्स मराठीवर.

First published: July 5, 2018, 2:43 PM IST

ताज्या बातम्या