जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / लवकरच येणार 'महेंद्र सिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चा सिक्वल!

लवकरच येणार 'महेंद्र सिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चा सिक्वल!

लवकरच येणार 'महेंद्र सिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चा सिक्वल!

महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचा दुसरा भाग ‘महेंद्र सिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, ता. 05: कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. त्याच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचा दुसरा भाग ‘महेंद्र सिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला लवकरच  सुरूवात होणार आहे. धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचा पहिला भाग 2016 मध्ये प्रर्दशित झाला होता आणि त्यात सुशांत सिंह राजपूत याने मुख्य भूमिका साकारली होती. त्यात त्याचे फुटबॉलकडून क्रिकेटकडे वळणे, तसेच त्याची टीम इंडियाचा कॅप्टन बनण्यापर्यंतचा संघर्ष दाखविण्यात आला होता. प्रदर्शित होणाऱ्या या दुसऱ्या भागातसुद्धा महेंद्र सिंह धोनीची मुख्य भुमिका सुशांत सिंह राजपूतच साकारणार असून, त्यात क्रिकेट करिअर व्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच त्याच्या आयपीएल टीम चैन्नई सुपर किग्सचा चैंम्पियन बनण्यापर्यंतचा प्रवास आणि 2015 मध्ये टीम इंडियाचा वल्ड कप पर्यंतचा प्रवास दाखविला जाणार आहे. या दुसऱ्या भागासाठीही सुशांत खूप मेहनत घेतोय. क्रिकेटचा सराव करणं, फिटनेस आणि लुकसाठीही त्याची खास तयारी आहे. सुशांत दररोज ग्राऊंडवर जावून क्रिकेटचा सराव करतोय. तर जीमचं वर्कआऊटही त्याचं चुकलेलं नाही. आपल्या स्टाईलिश लुकसाठी सुशांत सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत आहे. वजन आणि फिटनेस कायम ठेवण्यासाठी डाएटवरही त्याचं खास लक्ष असून सर्व तेलकट पदार्थ त्यानं वर्ज केले आहेत. धोनीसाखच हेही वाचा…

    VIDEO : शुक्रवारपासून महाराष्ट्रात मुसळधार!

    VIDEO :असं केलं जातं हेलिकॉप्टरमधून वृक्षारोपण

    मुकेश अंबानींनी केली दुसऱ्या जिओ फोनची घोषणा

    साईंच्या चरणी 350 कोटींचं दान! किती आहे सोनं आणि चांदी?

    प्रियांका चतुर्वेदींना ट्विटरवर धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात