अहमदनगर, 02 जुलै : लग्नासाठी ५० हजार घेतले, मुलगी दाखवली आणि साध्या पद्धतीने लग्नही लावून दिले मात्र लग्न करून सासरी आलेली मुलगी सत्यनारायणाची पूजा होताच दागिने घेवून पसार झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे घडलाय. नाशिक जिल्हयातील पांगरी येथील शेतकरी तरुणाची लग्न लावून फसवणूक करण्यात आली आहे. पांगरी येथील किशोर एकनाथ पगारे या शेतकरी कुटुंबातील मुलाचे 32 वय आहे. शेतकरी असल्याने लग्नाला मुली तयार होत नाही म्हणून कुणीतरी सांगितलं श्रीरामपूर येथील बाळासाहेब पठारे एखादं चांगलं स्थळ शोधून देतील म्हणून त्यांनी श्रीरामपूर गाठलं आणि बाळासाहेबाने एक मुलगीही दाखवली. तीला आई वडील नाहीत, गरीब कुटुंबातील असल्याचं सांगितलं. आणि पन्नास हजार रुपये द्यावे लागतील म्हणून बाळासाहेब पठारे याने सांगितलं. किशोरही लग्नाला तयार झाला कारण त्याचेही लग्न अनेक दिवसांपासून रखडले होते आणि किशोर साध्या पद्धतीने लग्न करून मुलीला आणि एका कलवरीला सोबत घेवून गावी परतला. इतर पाहुणे लग्नाला उपस्थित राहू शकले नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहुण्यांच्या, घरच्यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात दोघांचे लग्न लावलं. तिसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजाही झाली. मात्र मुलगी म्हणाली मला एकदा श्रीरामपूर येथील मामाला भेटून यायचं.. म्हणून किशोर दोघींना घेवून श्रीरामपूर इथं आला तर या नवऱ्या मुलीने मी साडी घेवून येते सांगून पोबारा केला. मुलीचा फोनही बंद झाला अन् घरही माहीत नाही. त्यामुळे किशोरला आपली फसवणूक झाल्याचं समजलं. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा किशोर पगारे याने मध्यस्थ इसम जॅकी उर्फ बाळासाहेब बबन पठारे, मुलगी प्रियंका प्रकाश रोकडे आणि आई अनिता प्रकाश रोकडे यांचे विरोधात गुन्हा दाखल केलाय. भादवि कलम ४२०, ३८४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईसह एकीला ताब्यात घेतले आहे. मध्यस्थ बाळासाहेब पठारे हा अजूनही फरार आहे. अशा प्रकारे त्यांनी किती जणांची फसवणूक केली हे पोलीस तपासानंतर समोर येईल. हेही वाचा होता वसीम म्हणून वाचले 5 हिंदू बांधव! हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप ‘काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







