होता वसीम म्हणून वाचले 5 हिंदू बांधव!

सध्या मुले पळविणारी टोळी फिरत असल्याच्या अफवेचे सर्वत्र पेव फुटले असून त्याचे लोण मालेगावात पोहोचले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2018 08:24 PM IST

होता वसीम म्हणून वाचले 5 हिंदू बांधव!

बब्बू शेख,मनमाड  

02 जुलै : राज्यभरात मुलं चोरण्याच्या अफवेमुळे निष्पपांचा बळी जातोय. मात्र, मालेगावात रविवारी रात्री एका मुस्लीम तरुणाने केवळ आपला जीवच धोक्यात घातला नाही तर समाजाशी वैर घेत संतप्त जमावाच्या तावडीत सापडलेल्या पाच हिंदू बांधवाचं प्राण वाचविलं. या तरुणाने केलेल्या कामगिरीची पोलीस विभागाने देखील दखल घेतली आहे.

सध्या मुले पळविणारी टोळी फिरत असल्याच्या अफवेचे सर्वत्र पेव फुटले असून त्याचे लोण मालेगावात पोहोचले. त्यामुळे प्रत्येकाला संशयाने पाहिलं जात आहे. रविवारी रात्री शहरातील आझाद नगर भागात 3 पुरुष एक महिला आणि एक तीन वर्षीय बालक फिरत असताना त्यांना मुले पळविणारी टोळी समजून काही तरुणांनी घेराव घातला आणि मारहाण सुरू केली याच ठिकाणी राहणारे वसिम अहमद घराबाहेर पडला आणि त्यांनी हे मुले चोरणारे नाही त्यांना मारू नका असं आवाहन केलं, मात्र संतप्त जमावाने त्यांना  मारहाण सुरूच ठेवली.

अखेर वसीम यांनी जमावाच्या तावडीतून कशीबशी या पाच ही जणांची सुटका करून त्यांना आपल्या घरात नेले ते पाहून जमाव आणखी चिडला आणि त्यांनी वसीमच्या घरावर हल्ला करून त्याच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि पाचही जणांना आमच्या हवाली करण्याची मागणी केली, मात्र वसीमने जीव गेला तरी चालेल मात्र एकाला ही तुमच्या हवाली करणार नसल्याचं जमावाला ठणकावून सांगितलं.

Loading...

मुले पळवून नेणारी टोळी एका घरात असल्याचं कळताच हजारोची गर्दी झाली आणि त्यांना आमच्या ताब्यात देण्याची मागणी करू लागले तेवढ्यात पोलीस घटनास्थळी आले, मात्र संतप्त जमावाने पोलिसावर हल्ला करून गाडीची मोडतोड करून दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. वसिमने दाखविलेल्या धाडसामुळे पाच जणांचे प्राण वाचल्याचे मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलंय.

हेही वाचा

हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक

...तर अफवांमुळे बळी गेलेल्यांचा जीव वाचला असता

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...