सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमिच्या खरेदी विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. बाजार भावानुसार या जमिनीची किंमत 1767 कोटी रूपये आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2018 05:59 PM IST

सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबई, ता,2 जुलै : नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमिच्या खरेदी विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. सरकारनं सिडकोची 24 एकर जमीन नियमबाह्य पद्धतीनं एका बिल्डरला हस्तांतरीत केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसचे नेते संजय निरूपम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.

बाजार भावानुसार या जमिनीची किंमत 1767  कोटी रूपये आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांच्या सांगण्यावरून मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना ही जमीन विकासासाठी दिल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

नियमानुसार ही जमीन सिडकोनंच विकसित करणं अपेक्षीत होतं मात्र असं न करता मुख्यमंत्र्यांच्या आर्शीवार्दाने ही जमीन बिल्डरच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप पृथ्विराज चव्हाण यांनी केला आहे.

संजय निरुपम यांचे आरोप

  Loading...

 •  सरकारचा हा 1767 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा आहे

 •  कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 8 शेतकरी कुटुंबांना मुंबई विमानतळाजवळ खारघर इथं 24 एकर जमीन देण्यात आली होती

 •  या आठ शेतकऱ्यांची जमीन पॅराडाईज या कंपनीचे मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी 15 लाख प्रतिएकर कवडीमोल किंमतीने आणि दमदाटीने खरेदी केली

 • 1767 कोटी रुपयांची जमीन फक्त 3 कोटी 60 लाख रुपयात जबरजास्तीने खरेदी केली

 •  हे बिल्डर भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचे जवळचे मित्र आहेत तसेच पार्टनरही असू शकतात.

 •  14 मे 2018 रोजी या जमिनीचं हस्तांतरण झालं आहे

 •  त्याच दिवशी या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी या बिल्डरांना मिळाली

 •  या प्रक्रियेला अनेक महिने लागत असताना त्याच दिवशी हा अधिकार कसा प्राप्त झाला?

 •  23 जून 2018 रोजी मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षक घेऊन जमिनीचा ताबा घेतला.

   

हेही वाचा...

   पाऊस पुन्हा परतणार का? काय म्हणालं हवामान खातं?

   महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

  विनोद कांबळीने प्रसिद्ध गायकाच्या पित्याला मारला बुक्का, पत्नीने काढली चप्पल

  मराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...