यवतमाळ, 02 जुलै : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करण्याची संतप्त घटना यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यात घडलीये.
4 एकर शेतीमध्ये पुरेसे उत्पन्न होत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करण्यासाठी 5 लाखाचे कर्ज मिळावे म्हणून शेतकऱ्यांच्या पत्नीने सर्व कागद पत्र गोळा केली.
मात्र सहा महिन्यानंतर देखील कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे याबाबत विचारणा केली असता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवांने शरीरसुखाची मागणी केली.
सचिवांच्या या मागणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने पोलीस स्टेशन गाठले. दारव्हा पोलीस स्टेशन या सचिवाच्याविरोधात तक्रार दाखल केलीये. मात्र अजूनही गुन्हा दाखल झाला नाही पोलीस अधिक तपास करीत आहे.
याआधीही पीक कर्ज वितरणाचा बोजवारा उडाला असताना एका बँकेच्या शाखाधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नीकडे पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली होती.
मलकापूर तालुक्याच्या दाताळा गावातील सेन्ट्रल बँकेच्या शाखाधिकारी राजेश हिवसे असं या नराधमाचं नाव आहे. पीक कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकरी दाम्पत्याकडून पीक कर्ज प्रकरणासाठी त्यांचा मोबाईल नंबर मिळवून फोनवर शेतकऱ्याच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी केली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.