हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

आयाराम नेत्यांना वैतागून मिरजेत भाजपच्या इच्छुक उमेदवाराने मुलाखती दरम्यान चक्क तीस लाख रुपयांचा चेक दाखवला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2018 07:39 PM IST

हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

सांगली, 02 जुलै : आयाराम नेत्यांना वैतागून मिरजेत भाजपच्या इच्छुक उमेदवाराने मुलाखती दरम्यान चक्क तीस लाख रुपयांचा चेक दाखवला. भाजप इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान संतप्त होऊन भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन चौगुले यांनी हा निर्णय घेतला. उमेदवारीसाठी आर्थिक सक्षम हाच निकष असेल तर माझ्याकडे तीस लाख रुपये आहेत असं चौगुले यांनी माईकवर जाहीर केलं.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मिरजेत खासदार, आमदार, आणि भाजपाचे पदाधिकारी मुलाखती घेत आहेत. मुलाखत सुरू असताना, प्रभाग सात मधील इच्छुक उमेदवार आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन चौगुले यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

आयारम नेत्यांना वैतागून मिरजेत भाजपच्या इच्छुक उमेदवाराने मुलाखती दरम्यान, चक्क तीस लाख रुपयांचा चेक दाखवला. भाजप उमेदवारीसाठी आर्थिक सक्षम उमेदवार असा निकष असेल तर माझ्याकडे तीस लाख रुपये आहेत असं चौगुले यांनी माईकवर जाहीर केलं.

Loading...

'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा'

तर मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी याबाबत धक्कादायक वक्तव्य केलंय. भाजपकडे पैसे घेऊन उमेदवार येत आहेत, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समजून घ्यावे. आणि सचिन चौगुले याने कदाचित तिरस्कारांने चेक दाखवला असेल, असं आमदार सुरेश खाडे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...