मराठी बातम्या /बातम्या /religion /

स्वप्नात सूर्य, चंद्र आणि इंद्रध्वज दिसणं आहे शुभ; पाहा काय सांगते भविष्य पुराण

स्वप्नात सूर्य, चंद्र आणि इंद्रध्वज दिसणं आहे शुभ; पाहा काय सांगते भविष्य पुराण

प्रत्येक मनुष्य झोपेत असताना स्वप्न पाहतो. या स्वप्नांचा अर्थही शास्त्रात सांगितला आहे. भविष्यपुराणानुसार सूर्यपूजेनंतर स्वप्न पाहण्याचे अनेक अर्थ आहेत.

प्रत्येक मनुष्य झोपेत असताना स्वप्न पाहतो. या स्वप्नांचा अर्थही शास्त्रात सांगितला आहे. भविष्यपुराणानुसार सूर्यपूजेनंतर स्वप्न पाहण्याचे अनेक अर्थ आहेत.

प्रत्येक मनुष्य झोपेत असताना स्वप्न पाहतो. या स्वप्नांचा अर्थही शास्त्रात सांगितला आहे. भविष्यपुराणानुसार सूर्यपूजेनंतर स्वप्न पाहण्याचे अनेक अर्थ आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 24 नोव्हेंबर : स्वप्न पाहणे किंवा न पाहणे हे माणसाच्या ताब्यात नाही. झोपेत असताना कधीही आणि कोणत्याही प्रकारची स्वप्न येऊ शकतात. कधी ते चांगले असतात, तर कधी ते वाईट आणि भीतीदायकही असतात. परंतु स्वप्रा शास्त्र आणि भविष्य पुराणांसह काही शास्त्रांनुसार, स्वप्नात येणार्‍या भविष्याचे काही संकेत दडलेले असतात. आज आम्ही भविष्य पुराणानुसार स्वप्नांच्या प्रभावाविषयी सांगणार आहोत.

भविष्यपुराणानुसार स्वप्न आणि आणि त्यांचे परिणाम

पंडित रामचंद्र जोशी यांच्या मते, भविष्य पुराणात सूर्यपूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. शास्त्रानुसार विविध प्रसंगी सूर्याची विधिवत पूजा केल्यानंतर जेव्हा रात्री जमिनीवर झोपल्यानंतर स्वप्ना पडतात त्याच्यात काहीतरी अर्थ दडलेला असतो. स्वतः सूर्यदेवाने याबद्दल सांगितले आहे. त्यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सूर्य, इंद्रध्वज आणि चंद्र दिसला तर त्याला सर्व समृद्धी प्राप्त होते.

खराब झालेलं पाकिट फेकून देत असताल तर थांबा! तुम्हाला माहिती हवी ही गोष्ट

श्रृंगार, तांदूळ, आरसा, सोन्याचे दागिने, वाहणारे रक्त, झाडे लावणे, केस गळणे, मेंढ्या, सिंह आणि जलप्राणी मारून खाणे, आपल्या अवयवाच्या भांड्यात खीर खाणे, अस्थी, सोने, चांदी आणि कमळाचे पान, जुगार आणि युद्धविजय, शरीराची जळजळ, आतड्यांमधून बाहेर पडणे, समुद्र आणि नदीचे पाणी पिणे, पर्वत निर्मूलन पाहणे आणि शिरोबंधन हे संपत्ती वाढवणारे आहेत. जो स्वप्नात धैर्याने समुद्र आणि नदी पार करतो त्याला दीर्घायुष्याचा पुत्र प्राप्त होतो. घोडा किंवा रथावरील प्रवासीही संतती सुखाची चाहूलही घेऊन येते.

या स्वप्नांतून लक्ष्मी आणि राजसुख

भविष्य पुराणानुसार स्वप्नात गाय, म्हैस आणि सिंहिणीला बांधून ठेवत्यांना दिसले तर सुख प्राप्त होते. त्याचप्रमाणे स्वप्नात अनेक डोकी आणि हात दिसणे हे घरात लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे.

जोडीदारावर भरभरून प्रेम करतात या महिला; ही जन्मतारीख असेल तर तिच्याशी बिनधास्त लग्न करा

स्वप्नात या पाच व्यक्तींचे म्हणणे करावे मान्य

पंडित जोशी यांच्या मते, भविष्य पुराणात असाही उल्लेख आहे की, काही लोक स्वप्नात जे बोलतात त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेववा. यामध्ये देवता, द्विज, श्रेष्ठ वीर, वृद्ध तपस्वी आणि गुरू यांनी स्वप्नात सांगितलेल्या गोष्टीचे पालन करावे, असे सांगितले आहे. स्वप्नातील त्यांचे दर्शन व आशीर्वाद हे श्रेष्ठ मानले जातात.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Religion